पालघर जिल्ह्यातील DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी यांच्या विशेष सहकार्याने जव्हार येथील दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे
त्यामुळे त्या डोळ्याने प्रत्येक मुलांनी पूर्ण जग बघितले पाहिजे. त्या अनुषंगाने दुर्गम भागातील गरीब गरजू मुले देखील चांगली शिकली पाहिजे आणि त्यासाठी शैक्षणिक साहित्यांपासून कोणी वंचित राहू नये .
ह्या दृष्टीने त्यांना एक मदतीचा हात पुढे करण्यासाठी.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी , साई पोल्ट्री फार्म (वसई) आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे मित्र एकत्र येऊन भूषण मोरे,दीपक वैती ,मुकेश जैन ,अजित कीणी ,योगेश चौधरी,ठाकूर पाटील , प्रकाश म्हात्रे ,महेंद्र भगत ,भुपेंद्र पाटील, प्रदीप पाटील,गिरिधर टोकरे,भावेश पाटील ,विश्वास पाटील यांनी आपल्या यथाशक्ती अशी काढलेली आर्थिक मदत गोळा करत त्या निधीतून शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी जव्हार येथील डोंगर दरी खोऱ्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळा, चोंडीपाडा तसेच जिल्हा परिषद शाळा विनवळ ता.जव्हार येथील २५५ गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

ह्यामध्ये वह्या,पेन ,पेन्सिल, , खोडरबर ,शोपनर,फूटपट्टी सोबतच खाऊ वाटप करण्यात आला.
ह्या प्रसंगी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था अध्यक्ष श्री नागदेव पवार, उपाध्यक्ष सतिश धर्मा गावड, साई पोल्ट्री फार्म चे मालक भूपेश पाटील, स्टेशन कमिटी सदस्य योगेश चौधरी,सौ.दामिनी पवार, जव्हार येथील पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मोरघा , चोंदिपाडा शाळेतील शिक्षक भोये सर आणि विनवळ शाळेतील शिक्षक यशवंत गावित ,अनिल तम्मलवार
,विजय रढे आणि ज्योती जाधव सर उपस्थित होते .



