शहर

सफाळे माकुणसार ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील ग्रामपंचायत माकुणसार हद्दीतील जिल्हा परिषद शाळा माकुणसार, रामबाग,करसोंडा या शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी कॅम्लिन कोकोयो लिमिटेड बोईसर यांच्या सौजन्याने आणि पंकज अरूण म्हात्रे माकुणसार ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थीना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


या प्रसंगी प्रमुख पाहुणे केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता . के. शेळके, सौ.पल्लवी जितेंद्र पाटील माकुणसार ग्रामपंचायत सरपंच, पंकज अरूण म्हात्रे तंटामुक्ती अध्यक्ष, माकुणसार ग्रामपंचायत सदस्य,शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ तसेच जेष्ठ नागरिक, महिला वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button