महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीची रणधुमाळी झाली सुरू ५ नोव्हेंबरला होणार मतदान

प्रतिनीधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 99 21 500 780

अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महाराष्ट्र राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे बिगुल अखेर वाजले आहे यासाठी दिनांक ५ नोव्हेंबरला२०२३रोजी मतदान होणार आहे. यासह ३०८० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील एकूण २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची,२९५० सदस्य पदारिक्त जागांसाठी आणि १३० थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी ची निवडणूकीची घोषणा आज करण्यात आली.निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी ह्या ठिकाणी आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान, यांनी ही घोषणा केली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहिती नुसार, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिके नुसार दिनांक १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील,त्यानंतर दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल ह्यातील पात्र नामनिर्देशन पत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल,तर मतमोजणी ०६नोव्हेंबर २०२३ रोजी होईल.मात्र गडचिरोली आणि गोंदिया आदी नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल आणि तिथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.आणि ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिक सुचना प्रसिद्ध करतील, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button