महाराष्ट्र

करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवी आमले यांच्याकडे करमाळयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पालकमंत्री करण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

धाराशिव जिल्हाचे पालकमंत्री असलेले डॉ. तानाजी सावंत यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी करमाळयातील शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवि आमले यांच्याकडे एकमुखाने केलेली आहे. आमले हे पदाधिकारी आढावा बैठकीसाठी करमाळा दौऱ्यावर आले असता पालकमंत्री बदलाची मागणी करण्यात आली.

यावेळी आढावा बैठकी दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा पाहता सोलापूर जिल्हयातील शिवसेनेसह महायुतीची ताकत निर्माण करण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पालकमंत्री करावे. एकेकाळी सोलापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु सक्षम नेतृत्वा अभावी जिल्हयात शिवसेनेची पिछेहाट होताना पहायला मिळत असल्याची तक्रारही यावेळी पदाधिकाऱ्यांनी रवी आमले यांच्याकडे केलेली आहे.

पुढे बोलताना शिवसेनेचे पदाधिकारी म्हणाले की, आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे धाडसी व अभ्यासू नेतृत्व असून ते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांना स्थानिक प्रश्नांची व राजकारणाची जाण आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभल्यास आगामी विधानसभा निवडणुकात महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील व सावंत यांच्याकडून शिवसेनेसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना ऊर्जीत अवस्था प्राप्त होईल असा विश्वास ही यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.

बैठकी अंती पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा व भावनेचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन यावेळी करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवी आमले यांनी पदाधिकाऱ्यांना दिले व लवकरात लवकर यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी बैठक लावून पदाधिकाऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याचे रवी आमले यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितले.

सदर बैठकीसाठी करमाळा शिवसेना तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना तालुका उपप्रमुख दादासाहेब तनपुरे, श्रीकांत गोसावी, सुभाष पाटील,युवा सेना उपशहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार, शिवसेना महिला उप तालुका प्रमुख शामल रंदवे, शहर प्रमुख गिता हेंद्रे, उपशहर प्रमुख रुपाली शिंदे, फर्जना मुलाणी, मनिषा कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button