अकलूजकर अनुभवणार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा भव्य सत्कार…

अकलूजच्या ऐतिहासीक विजय चौकात उद्या विजयाचा जल्लोष…
अकलूज च्या जनतेशी कसा हितगुज साधणार या कडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

माढा लोकसभेचा निवडणूक निकाल लागून एक महिना उलटून गेला तरी अकलूजकरांच्या “हक्काचा माणूस” जनतेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदार संघातील जनतेचे आभार व्यक्त करत आणि संबंधित ठिकाणी सत्कार समारंभ व गाव भेटी थांबता थांबेना…
जनतेचे अलोट प्रेम आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रेमापोटी खासदार धैर्यशील मोहिते पाटील पाटील यांनी पायाला विकासाची भिंगरी लावलेली आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावोगावी जाण्याचा प्रयत्न करत तेथील जनतेचे आभार व त्या ठिकाणची जनता त्यांचा सत्कार करत असेच दिवस जात असल्यामुळे अकलूज मधिल जनतेने उद्या ६.०० वाजता ऐतिहासीक विजय चौक येथे सत्कार समारंभ आयोजित केला आहे…
खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज च्या तमाम जनतेला उद्या भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे…

माढा लोकसभा निवडणुकी नंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना वेळेअभावी भेटता आले नाही परंतु अनेक विजयांचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासीक विजय चौकात ते काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिली आहे…

अकलूज च्या जनतेने आणि “शिवरत्न” वर प्रेम असणाऱ्या तमाम निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आपल्या लोकप्रिय खासदारांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती वार्ड क्रमांक ३ मधील कार्य कर्त्यांनी केले आहे…



