महाराष्ट्र

गणेशवाडीचे प्रगतशील बागायतदार मारूती भाऊ घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

गणेशवाडी गावचे प्रगतशील बागायतदार मारूती ( भाऊ) धोंडिबा घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय १०५ वर्षाचे होते. त्या़ंच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निरा भिमा कारखान्याचे संचालक हरिभाऊ घोगरे, गणेशवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष भारत घोगरे यांचे वडील तर बावडा ग्रामपंचायत सदस्य तेजस घोगरे व एम. जे. एन्टरप्रायजेसचे मालक जयदिप घोगरे यांचे ते आजोबा होते.

कर्मयोगी माजी खासदार शंकरराव पाटील ( भाऊ ) व लोकनेते शहाजीराव पाटील यांचे सहकारी म्हणून एकेकाळी निरा व भिमा नद्यांच्या पट्ट्यातील जवळपास पस्तीस गावांची पाटीलकी मारूती भाऊ घोगरे यांनी सांभाळली होती. त्यांच्यानंतर भाऊंनी हर्षवर्धन पाटील यांना राजकारणात मार्गदर्शकांची भुमिका निभावत साथ सोबत दिली. मारूती भाऊंच्या शब्दाला राजकारणात मोठे वजन होते. त्यांनी टाकलेल्या शब्दाला नकार देण्याची हिंम्मत कोणत्याही राजकीय नेत्यांमध्ये नव्हती. भाऊंच्या घरी दररोजच जनता दरबार भरत होता.

भाऊंच्या निधनाची बातमी समजताच माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती प्रशांत पाटील, बावड्याचे सरपंच किरण पाटील, दादासाहेब घोगरे, बाळासाहेब मोहिते, अमरसिंह पाटील, उमेश शेटे यांच्या सह सर्वच क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ त्यांच्या अंतविधीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button