पालघर जिल्ह्यातील बोईसर आणि पालघर विधानसभेचे भावी आमदार कोण…..?

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर तालुक्यातील पालघर आणि बोईसर या दोन विधानसभेचे भावी आमदार कोण…? माजी खासदार राजेंद्र गावित की माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, राजेश पाटील, भारती कांबडी की माजी आमदार विलास तरे, जगदीश धोडी, विश्वास वळवी की अखेर अपक्ष उमेदवार असा राजकीय वर्तुळातील जनसामान्य जनतेला पडलेला प्रश्न असला तरी पालघर जिल्हा भाजपचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी 2024 रोजी लोकसभेवर डॉक्टर हेमंत सावरा यांना बहुमताने निवडून आणल्यावर असा दावा केला आहे की बोईसर आणि पालघर विधानसभेवर दोन्ही आमदार भाजपचे असतील असे असताना देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना गट भाजपला रोखठोक उत्तर देण्यासाठी व पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे दाखवून देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गावा गावात पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
तर माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी आपली राजकारणातील कारकीर्द बाधित ठेवण्यासाठी आपल्या भाजप पक्षाकडे पालघर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी व तिकीट दिल्यावर निवडून येण्यासाठी व स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम टिकून ठेवण्यासाठी भाजप वरिष्ठ नेत्यांकडे आपला मोर्चा ठाम मांडला असला तरी पालघर जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष भरत राजपूत जे उमेदवार ठरवतील त्यांनाच भाजप पक्ष तिकीट देणार असल्याचे बोलले जात आहे.
यामागचे एकमेव कारण म्हणजे मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांनी डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी देऊन त्यांना बहुमताने निवडून आणण्याची हमी भाजप वरिष्ठ नेत्यांना दिली होती. या विश्वासाला त्यांनी तडा न जाऊ देता डॉक्टर हेमंत सावरा यांना पालघर लोकसभेवर बहुमताने निवडून आणले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप वरिष्ठ नेते पालघर जिल्ह्यातून पालघर तालुक्यातील पालघर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार निवडण्याचे अधिकार पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरत राजपूत यांना दिले असल्याचे राजकीय सूत्राकडून बोलले जात आहे.

नोव्हेंबर 2024 रोजी होणारी पालघर आणि बोईसर विधानसभेची निवडणूक बहुजन विकास आघाडी भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी तिरंगी लढत होणार असली तरी विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिंदे शिवसेना गटातील उमेदवार पालघर विधानसभेवर निवडून आणण्याची गर्जना केली आहे.
याच संधीचा फायदा एकनाथ शिंदे समर्थक शिंदे शिवसेना गट माजी खासदार राजेंद्र गावित यांना होणार असला तरी मात्र माजी राज्यमंत्री व हॅट्रिक आमदार मनीषा निमकर व डॉक्टर विश्वास वळवी एकनाथ शिंदे समर्थक शिंदे शिवसेना गट याच पालघर विधानसभेतून आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आणि जर राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी जवळीक साधली तर पालघर विधानसभेतून माजी खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट आणि पाठिंबाही दिला जाऊ शकतो आणि ज्यांच्या पाठीमागे भरत राजपूत सारखा खंबीर डॅशिंग जिल्हाध्यक्ष उभा बसल्यावर तो उमेदवार निवडून येणारच असेही भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांच्या समर्थनांकडून बोलले जात आहे.
तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या भारती कांबडी पालघर विधानसभा मतदारसंघातून
इच्छुक असल्या तरी अनेक जुने उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक देखील ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत.

तर बहुजन विकास आघाडीकडे पालघर या मतदारसंघातून ही आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असा जाणकार उमेदवार नसला तरी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष हितेंद्र ठाकूर पालघर मतदारसंघात एक नवा चेहरा उमेदवार उभा करून निवडणूक लढवून या जागेवर विजय प्राप्त करतील अशी आशा पालघर मतदार संघातील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
तर बोईसर विधानसभेच्या उमेदवारीसाठी पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांचे समर्थ माजी आमदार विलास तरे ही निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.
या मतदारसंघात जर विलास तरे उभे असले तर बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार राजेश पाटील शिवाय बहुजन विकास आघाडीला पर्याय नाही आणि दुसरा खंबीर नेता ही बहुजन विकास आघाडीकडे बोईसर मतदार संघातून उपलब्ध नसल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजेश पाटील यांच्या नावाला या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी 100% मंजुरी दिल्याचे त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे.
यामुळे आता पालघर आणि बोईसर या दोन्ही मतदारसंघातून भाजप, बहुजन विकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, एकनाथ शिंदे शिवसेना गट आपापले उमेदवार रिंगणात उभे करणार हे जरी निश्चित असले तरी या दोन्ही मतदारसंघातून नवीन पदवीधर उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी ही या भागातील मतदारांकडून जिल्ह्याच्या विकासाच्या नावावर केली जात आहे.



