महाराष्ट्र

चंद्रशेखर गायकवाड -लिखित “यशस्वी माणसाची शक्ती सकारात्मक विचार “या पुस्तकाचे प्रकाशन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज येथील नामवंत व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड लिखित “यशस्वी माणसाची शक्ती सकारात्मक विचार “या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकलूज बस आगारात आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले
चंद्रशेखर गायकवाड हे नामवंत व्याख्याते असून एक उत्कृष्ट कवी लेखक आहेत त्यांचे व्याख्यान हे अभ्यासपूर्ण असल्याने त्यांच्या व्याख्यानाला श्रोते आवर्जून उपस्थित राहतात चंद्रशेखर गायकवाड हे अकलूज आगारात वाहक या पदावर कार्यरत असून त्यांचा शिवचरित्रावर गाढा अभ्यास आहे

सोलापूर जिल्ह्यात नामवंत व्याख्याते म्हणून त्यांची ख्याती आहे या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 9 मे 2023 रोजी झाले असून चंद्रशेखर गायकवाड लिखित हे 23 वे पुस्तक आहे या पूर्वी विविध विषयावरील त्यांनी 22 पुस्तके लिहून प्रकाशित झाले आहेत सदर पुस्तक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मनात आत्मविश्वास ध्येय जिद्द निर्माण करणारे हे पुस्तक युवक ,वक्ते ,विचारवंत, शिक्षक ,इत्यादीना उपयुक्त असून या पुस्तकाच्या वाचनाने सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ए, डब्ल्यू ,एस ,अनिरुद्ध सूर्यवंशी. हेड मेकॅनिकल- राजेंद्र राऊत, वाहन परीक्षक आगतराव गळगुंडे, शब्बीर काझी ,बाळासाहेब सूर्यवंशी, तसेच अकलूज आगारातील बहुसंख्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी लेखक चंद्रशेखर गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button