स्थानिक आमदार,खासदारांवर बाधित शेतकऱ्यांचा प्रचंड रोष.सुरत चेन्नई बाधित शेतकऱ्यांचा एकाच दिवशी सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण करणार

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . —– 97 30 867 448
सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांनी योग्य मावेजा मिळण्यासाठी सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यातील तहसीलसमोर येत्या शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित बैठकित बाधित शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार,खासदारांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. उस्मानाबाद,सोलापूर जिल्ह्यात सुरत चेन्नई हा मार्ग जाणार असून सध्या या भागात भाजपाचेच आमदार व खासदार असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवला नाही.त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे मत आजच्या बैठकीत ग्रीनफिल्ड संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे हे होते.

येत्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उस्मानाबाद, तुळजापूर, वैराग,बार्शी,उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट येथे शेतकऱ्यांनी एकाच दिवशी एकाच वेळी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला.लाक्षणिक उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा त्यानंतर आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण कुटुंबासह आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीत बाळासाहेब मोरे,स्वामीनाथ हरवाळकर,शाकीर पटेल यांनी मार्गदर्शन केले
बैठकीसधोत्री,बोरेगांव,डोंबरजवळगे,तीर्थ,चपळगाववाडी,चपळगांव,दहिटणेवाडी,कोन्हाळी,अक्कलकोट ग्रामीण,नागुर,नागनळ्ळी,बोरीउमरगे,मैंदर्गी,दुधनी,हसापुर, ब्यागेहळ्ळी आदी गावांमधील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .



