एम ए सी बी महावितरण विरार येथील नितीन भोईर या कर्मचाऱ्याचा उपचारा अभावी मृत्यू

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे राहणाऱ्या एका (30) वर्षीय तरुणाचा 10 फूट उंच शिडी वरून पडून डोक्याला जबरी मार लागल्यामुळे त्याचा उपचारा अभावी मृत्यू झाला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री विरार येथे घडली असून तो एमए सी बी महावितरण बाजार वाड विरार येथे कार्यरत असताना ही घटना घडली आहे.

सफाळे टेंभीखोडावे येथे राहणारा (30) वर्षीय तरुण नितीन भगवान भोईर हा गेल्या 6 वर्षापासून एमए सी बी महावितरण बाजार वाड विरार येथे कंत्राटी पद्धतीने वायरमन या पदावर काम करत होता .
मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विरार पूर्व जीवदानी परिसरात जळलेली केबल वायर दुरुस्ती करण्यासाठी नितीन भोईर गेला असताना तो खाली असलेल्या गटाच्या लोखंडी झाकणावर पडून त्याच्या डोक्याला जबरी मार लागल्यामुळे व योग्य वेळी त्याला योग्य उपचार न मिळाल्यामुळे नितीन भोईर याचा बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी मृत्यू झाला आहे.



