अकलूज च्या मुस्लिम चळवळीतील बहरते नेतृत्व म्हणजे हाजी जमीर चौधरी…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क अकलूज
9890299499
माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी,अकलूज मधल्या अडल्या नडलेल्यांसाठीचं हक्काचं नाव,एक दिलदार मित्र,संवेदनशील माणूस,सतत पाॅजिटिव्ह,रात्री तीन वाजताही मदतीसाठी आलेला काॅल हसून अटेंड करणारा “जिंदादिल” माणूस,एकदा एखादे काम हाती घेतल्यास तसूभरही आपल्या मिशनपासून न हटणारा चिवट माणूस,डोळे मिटून बिनधास्त भरोसा करावा असा विश्वासू खांदा म्हणजे माझे स्नेही,मित्र,सखा,सोबती हाजी जमीर चौधरी…

एखाद्या कुटुंबातल्या पोरांकडे प्रचंड सामर्थ्य असतं फक्त त्याला संधी मिळत नाही,खूप झगडावं लागतं,पण ती संधी मिळाली की त्याचं सोनं होतं हे या माणसानं दाखवून दिलंय,खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या माणसाचं सामर्थ्य ओळखलं आणि खंबीरपणे साथ देत अकलूज येथील मुस्लीम समाजाचे नेतृत्व करण्याची संधी दिली…

आलेल्या संधीच सोन करत अकलूज च्या महादेव नगर येथील मोहम्मदिया अरबी मदरसा चा विषय असो किंवा चांदतारा फाउंडेशन चा,प्रत्येक सामाजिक विषयात हिरहिरीने भाग घेत आपल्या नेतृत्वाची चुणुक दाखविली…

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कधी कुठल्याही पदाचा गैरवापर होऊ न देता संवेदन शिल विचार घेऊन समाजासाठी झटत राहणारा त्याच्या सम तोच असु शकतो…

दिवसरात्र फक्त एका फोन काॅल वर लोकांची कामे करणारा हा माणूस मागे विरोध करणाऱ्या आणि मोबाईल वर गोड गोड बोलून शुभेच्छा देणाऱ्या लोकांना हि “आधारवड” वाटतो हे मात्र तितकेच खरे…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क समूह,बागवान न्यूज आणि अल्पसंख्यांक विकास मंडळा कडून हि हाजी जमीर चौधरी यांना या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…



