शहर

जिल्हास्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतमॉडेल विविधांगी प्रशालाचे यश

माळीनगर प्रतिनिधी– रियाज मुलाणी
मो. 9922 500 780

महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा सोलापूर यांचे वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेमध्ये दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर मधील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले.

जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत अक्षरा तुपे, अंकिता चवरे,विद्या सरतापे, रविराज तुपे,साहस लोखंडे यांनी प्रथम क्रमांक; आदित्य बांदल,सानिका रानमाळ यांनी द्वितीय क्रमांक); मराठी हस्ताक्षर स्पर्धेत सिद्धी तुपे,ऋतुराज चव्हाण तर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेत गौरी गोफणे यांनी प्रथम क्रमांक, रिजवान सय्यद याने द्वितीय क्रमांक .त्याचप्रमाणे गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कुलचे विद्यार्थी यांनी रंगभरण स्पर्धेत स्वरा शिंदे(प्रथम क्रमांक),अधीरा दळवी (द्वितीय क्रमांक),सई शेंडगे(तृतीय क्रमांक)तर उपक्रमशील कलाशिक्षक संजय पवार,उपक्रमशील कला शिक्षिका रजनी चौरे आणि उपक्रमशील मुख्याध्यापक प्रकाश चवरे यांना सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी प्रकाश गिरमे,खजिनदार पृथ्वीराज भोंगळे,संचालक अशोक गिरमे,ॲड.सचिन बधे,अनिल रासकर,रत्नदीप बोरावके,अजय गिरमे,डॉ.अविनाश जाधव,कल्पेश पांढरे,दिलीप इनामके,लिनाताई गिरमे,ज्योतीताई लांडगे,प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार,पर्यवेक्षक रितेश पांढरे व शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button