शहर

सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील (29) वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नवऱ्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के.शेळके यांनी केले 48 तासात जेर बंद

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा पाडा येथे एका (29) वर्षीय विवाहित महिलेचा धारदार चाकूने गळा चिरून हत्या करणाऱ्या तिच्या पतीला केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के.शेळके आणि सफाळे पोलीस टीमने अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे.
सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा पाडा केळवा रोड येथे राहणारे पण मूळचे यूपीचे सौ.सुमन बुद्धिराम कनोजीया वय वर्ष (29) व तिचा पती बुद्धीराम कनोजिया हे दांपत्य गेल्या अनेक वर्षापासून या भागात भाडेतत्त्वावर राहत होते.


बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 07.15 वाजण्याच्या सुमारास सुमन कनोजीया राहात असलेल्या तिच्याच घरात तिची धारदार चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली होती.


या घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला जेरबंद करण्याचे आदेश केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता . के. शेळके यांना दिले होते.


या आदेशांची अंमलबजावणी करून अवघ्या 48 तासात सुमन कनोजिया हिचा हत्यारा आरोपी बुद्धिराम कनोजिया या तिच्या पतीला केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के. शेळके, महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील सफाळे पोलीस ठाणे, पोलीस हवालदार कैलास शेळके, पोलीस शिपाई चिमकर, पोलीस हवालदार कल्पेश केणी, पोलीस हवालदार खोत, पोलीस नाईक सातपुते या टीमने बुद्धिराम कनोजिया याला केळवा रोड परिसरातून अटक करून जेरबंद केले आहे.


याबाबत पुढील तपास सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदले करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button