“आता लक्ष्य विधानसभा”– खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमी वर मतदार जोडणी व पक्ष बांधणी च्या दृष्टीने पालघर लोकसभाचे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पालघर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्याची विस्तारित जिल्ह्या कार्यकारणी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणूकित कश्याप्रकारे यश मिळेल व पक्ष बांधणी, मतदार जोडणी या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच महायुती सरकारच्या जनहिकारी योजना घराघरात जाऊन लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. या संमेलनात जिल्ह्यातील राष्ट्रवादी व CPM पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला.

या विस्तारित जिल्हा कार्यकारणीला जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. भरतभाई राजपूत, जेष्ठ नेते श्री. बाबाजी काठोळे सर, प्रदेश सचिव सौ. सुरेखाताई थेतले, जेष्ठ नेते हरी भोये सर, डहाणू विधानसभा प्रमुख अमित घोडा, कृषी सभापती संदीप पावडे, सरचिटणीस अशोक वडे, सुशील औसरकर, सौ. ज्योती भोये, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, प्रशांत संखे, जगदीश राजपूत, तेजराज हजारी, नंदन वर्तक, मिलिंद झोले, महेश आळशी, मधुकर खुताडे, नरेश आकरे, गीतांजली सावे, विजया लहारे, रंजनाताई संखे, सुजाता माळी व सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



