अकलूज येथे संस्कार से संसार परिवर्तन कार्यक्रम उत्साहात साजरा.

उपसंपादक -–हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय,शिवालय अकलूज संग्रामनगर यांच्या वतीने दि.२ जून ते ४ जून या कालावधीत ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंट आबू येथील महारथी,राजयोगी ,ब्रह्माकुमार आदरणीय सुरजभाई,रुपेशभाई व राज योगीनी ब्रह्माकुमारी गीता दिदी यांच्या उपस्थितीत हा संस्कार से संसार परिवर्तन कार्यक्रम संपन्न झाला.

यामध्ये दि.२ जून रोजी सर्वांसाठी समस्या का समाधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंधू भगिनींनी उपस्थित होते व आदरणीय सुरजभाई यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

३ जून रोजी जिल्ह्यातील कुमार व कुमारी याच्यासाठी योगभट्टीचे आयोजन करण्यात आले.यात राजयोगी सुरजभाई,राजयोगी रुपेशभाई व राजयोगीनी गीताबहेन यांनी तरुणांचा संघटीत योग घेतला. त्याचबरोबर तरुणांनी व्यसनाकडे न वळता अध्यात्माकडे कसे वळावे यावर प्रकाश टाकला.यात प्रामुख्याने क्षमाभाव,मनाचे शुद्धीकरण,कर्मगती याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सोलापूर सबझोनच्या मुख्य संचालिका राजयोगीनी सोमप्रभा दिदी उपस्थित होत्या.

दि.४ जून रोजी संस्कार से संसार परिवर्तन याकार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,धैर्यशील मोहिते-पाटील,किशोरसिंह माने-पाटील,डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील,सौ.उर्मिलादेवी मोहिते-पाटील, सौ.कांचनमाला मोहिते-पाटील,सद्गुरू मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज,सद्गुरू शिंगणापूरकर शिवाचार्य महाराज व सद्गुरु कोळेकर शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती होते.
या कार्यक्रमात आठ कुमारी (अष्टरत्न) यांच्या समर्पण सोहळ्याने सर्व अकलूजकरांचे लक्ष केंद्रित करून घेतले.याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले.या तीनही महारथींच्या व्याख्यान पर उद्बोधनाचा लाभ पुणे , सोलापूर, बीड, उस्मानाबाद, सांगली,सातारा,परभणी जिल्ह्यातील सर्वांनी लाभ घेतला.तीन व चार जून रोजी सर्वांना अकलूज मीठा परिवार यांच्या वतीने ब्रम्हाभोजन देण्यात आले.

मोहिते पाटील कुटुंबीय अकलूजकर यांनी प्रमुख पाहुण्यांना शिवरत्न या निवासस्थानी बोलवून त्यांचा यथोचित सन्मान केला.ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूजच्या संचालिका राजयोगीनी ब्रह्माकुमारीज शिवरात्री दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मीठा परिवाराने तत्परतेने सर्व सेवा सेवाभावी वृत्तीने ईश्वरीय कार्य समजून पार पाडल्या.या कार्यक्रमाची वाहवा केवळ अकलूज पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.संपूर्ण योगभट्टीचे सुत्रसंचालन ब्रम्हकुमारी अनिता बहन करवा (बार्शी) यांनी केले.या सर्व उपस्थितांना प्रसाद व सौगात देऊन शक्तीशाली भट्टीची सांगता झाली.



