विरार येथे झालेल्या 26 व्या कला क्रीडा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जीविका पाटील प्रथम तर द्वितीय क्रमांक खुशी जोशी आणि तिसरा क्रमांक राजवी पाटील हिने पटकावला आहे
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
वसई विरार शहर नगरपालिका यांच्या वतीने 26 वा कला क्रीडा महोत्सव विरार येथील नवीन विवा विद्यालय येथे शनिवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या 26 व्या कला क्रीडा महोत्सवातील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विरार भागातील अनेक शाळा मधील साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.12 वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी जीविशा विजय पाटील डॉ. एन. पी शहा इंटरनॅशनल मीडियम स्कूल विरार तर द्वितीय क्रमांक खुशी जोशी,आणि तिसरा क्रमांक कुमारी राजवी नितेश पाटील एक्सपर्ट इंटरनॅशनल स्कूल विरार या तीन मुलींनी पटकावला आहे.
तर 12 वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमार प्रद्युम अमित मिश्रा गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल विरार तर द्वितीय क्रमांक कुमार भद्र चारुदत्त पाटील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल आणि तृतीय क्रमांक कुमार तेजस रत्नाकर राणे सेंट पीटर स्कूल तर
14 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मयंका राकेश राणे द्वितीय क्रमांक पाद्ये अनुश्री जितेंद्र तिसरा क्रमांक कुमारी सर्वज्ञा बर्वे तर 14 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक स्वरंग पराग मुकणे तर द्वितीय क्रमांक हरिशंकर अय्यर आणि तिसरा क्रमांक अर्णव सुरेश पाटील
तर 17 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक आर्या राऊत द्वितीय क्रमांक इशा पटेल तर तिसरा क्रमांक समीना ताहीर साठी तर 17 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक इलेश त्रिपाठी द्वितीय क्रमांक शुभम मिश्रा आणि तिसऱ्या क्रमांक देवाशिष रंजीत कुमार यांनी पटकावला आहे.
तसेच महाविद्यालयीन विभाग बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलांपैकी प्रथम क्रमांक ओमकार हेमंत साटम आणि द्वितीय क्रमांक समीर आनंद मिश्रा तर तिसरा क्रमांक अमोल अरविंद आगाशे आणि महाविद्यालयीन विभाग मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अभा मिलिंद गावकर द्वितीय क्रमांक अनिशा बनवल तर तिसरा क्रमांक कशिष प्रमोद हिने पटकावला आहे. या स्पर्धेचे संचालक दीपक आडे ,तर मुख्य पंच गजानन सोनी ( वर्ल्ड चेस फेडरेशनचे फीडे ऑर्बिटर ) व उपमुख्य पंच अमेय कानेटकर वर्ल्ड चेस फेडरेशनचे फीडे ऑर्बिटर ) पंच नितीन पेंडणेकर, मनोज गोरे मिलिंद गावकर, राहुल सोनी, विविध गावकर,अर्पित पासी, माया पाटील,राकेश राणा या पंचांनी या बुद्धिबल स्पर्धेचे पंचाचे काम चोखपणे पार पाडले