आदिवासी एकता परिषदेचे 6 वे आदिवासी सांस्कृतिक जिल्हा संमेलन सफाळे ठाकूरपाडा येथे संपन्न.
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
आदिवासी संस्कृतीवर वेगवगेळी आक्रमणे येऊ पाहत आहेत तरी आपली संस्कृती, जल, जंगल जमीन टिकवण्यासाठी तरुणांनी जवाबदारी घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आदिवासी समन्वय मंच भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी एकता परिषदेचे सचिव डॉ. सुनील पऱ्हाड यांनी सफाळे येथे केले.
अन्यथा आपण आणि आपला गाव शिल्लक राहणार नाही. असेही ते म्हणाले. आदिवासी एकता परिषदेकडून सफाळे ठाकूरपाडा कपासे येथे 6 वे आदिवासी सांस्कृतिक जिल्हा संमेलन आणि आदिवासी क्रांतीविरांची संयुक्त जयंतीसाठी रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आसाम, राजस्थान तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने मान्यवर तसेच कलाकार आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. भव्य तारपा प्रतिकृती आणि आदिवासी देवदेवता संस्कृती दर्शन हे विशेष आकर्षण होते.
या संमेलनात शनिवारी दुपार पासून ते रात्री 2 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. आसाम येथील तरुणांनी आदिवासी संस्कृती दर्शन, बोलीभाषा आणि नृत्य यांचे सादरीकरण हे या संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरले.सफाळे पूर्व गेरूच्या ओहळावरून रॅलीला सुरुवात करून कार्यक्रमाला या संमेलनाचा शुभारंभ करून माकणे येथून बिरसा मुंडा चौकाला अभिवादन करण्यात आले.
यांनंतर रॅलीचे कार्यक्रमात रूपांतर करण्यात आले.
जागतिक कीर्तीचे तारपा वादक भिकल्या धिंडा, घान्गली वादक सोनू म्हसे यांनी आपली कला सादर करून उपस्थित्यांची मने जिंकली. लावणी सम्राट आर्यन गटाचे युट्युब कलाकार नितेश बुंधे,भरत गवळी, महेश बेलकर, अजय शिंदे, दिनेश भोईर, सोनू म्हसे, धर्मा बेलकर, रुपेश कडव, राजेश मसमारे यांनी आपल्या कला सादर करून तरुणांना खिळवून ठेवले. यावेळी चिमुकल्यानी आदिवासी संस्कृतीवर आधारित परंपरीक नृत्य, नाटक, सादर केली.
या संमेलनाला प्रकाश पांडुरंग कोंब सरपंच ग्रामपंचायत कपासे, डॉ. सुनील पऱ्हाड – राष्ट्रीय अध्यक्ष, आदिवासी समन्वय मंच इंडिया, प्रेमिला बेन वसावा (गुजरात) – महिला सेल अध्यक्षा, राजू पांढरा केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य, किर्ती वरठा- केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य, स्टेलीन इंगटी (आसाम) अध्यक्ष मंडळ सदस्य, विलास बेलकर, बाळकृष्ण धोडी, प्रदीप ढाक, उमेश ढाक, चेतन उराडे, रान उराडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या संमेलनात प्रदीप ढाक यांना पालघर जिल्हा सचिव पद व पूर्णिमा देवराम परेड यांना पालघर जिल्हा सहसचिव पदाची जवाबदारी देण्यात आली.
यावेळी गजानन पागी, गीता पागी, नितीन बोंबाडे, अरविंद बेंडगा,सुरेखा पटेल, मीना वावरे, धनेश सुतार, राजेश ढाक, वंदना जाधव, निलेश वरठा,हरिश्चंद्र धोडी, प्रविण शेलका, विजय खेवरा, दिलेश भोईर, विकास शेलका, प्रतिभा ढाक, राकेश खानझोडे, कैलास तांडेल, विकास नडगे, गणेश बोंबाडे, सुनील बोंबाडे, रविंद्र दळवी, अनिल बरड,विकास दुमाडा, रतन तुंबडा,रेखा बुजड, रत्नेश म्हसकर, मिलिंद वाडु, सचिन मालकरी, भरत मालकरी, तुकाराम पटेल, सुवर्णा रावते, समीर वरठा, संदीप लहांगे, जगन धोडी, कैलास चौरे, सुरेश भोईर, पूर्णा परेड, विशाल गोलीम, चंदन ढाक यासह कार्यकर्ते उपस्थित होते.