राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने जव्हार येथे 75 वा अमृत महोत्सव संविधान दिन साजरा
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
राष्ट्रीय पँथर्स आघाडी व स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या विद्यमाने 75 व्या अमृतमहोत्सव संविधान दिनाच्या निमित्ताने (जागर संविधानाचा) या भव्य संविधान रॅलीचे आयोजन मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
भारतीय संविधान दिनाच्या जयघोषाने भव्य दिव्य संविधान रॅलीची सुरुवात सकाळी 11.00 वाजता श्रीमंत यशवंत राव महाराज चौक येथून होऊन पुढे मांगेलवाडा, अंबिका चौक, टारफा चौक, महात्मा गांधी चौक, पाच बत्ती नाका आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रॅलीचे समापन करण्यात आले. तसेच विविध शासकीय कार्यालयांना भेटी देण्यात येऊन भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट देण्यात आल्या.
राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने सन 2014 पासून भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळ्या तालुक्यात महारॅलीचे आयोजन करून बहुजन समाजाच्या गावांना भेटी देऊन संविधान दिनाचे महत्त्व, प्रसार तसेच संविधानाने जनतेला दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायव्यवस्था दिलेले मूलभूत अधिकार, हक्क , कर्तव्य यांची जाणीव बहुजन समाजाला करून देण्यासाठी तसेच महापुरुषांच्या विचारधारा बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय पँथर्स आघाडी प्रत्येक वर्षी अशा पद्धतीच्या विविध सुप्त कार्यक्रमाचे आयोजन करून बहुजन समाजापर्यंत संविधानाची महती पोचवण्याचे काम अखंडपणे करत आहे.
त्याच अनुषंगाने या वर्षी सुद्धा बहुल आदिवासी तालुका असलेल्या जव्हार तालुक्यात संघटनेच्या वतीने देशाच्या संविधाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने अमृत महोत्सव संविधान दिन “जागर संविधानाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करून चौका चौकांमध्ये महापुरुषांना अभिवादन करून संविधानातील देशातील जनतेचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य याची जाणीव उपस्थित जनतेला करून देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सर्वेसर्वा अविश राऊत यांनी उपस्थित कार्यकर्ते व जनतेला संबोधित करताना भारतीय संविधान मानवाच्या उत्थानाचे साधन असून देशातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य बहाल करतो. भारतीय संविधानाच्या पहिल्याच आर्टिकल मध्ये देशाचे नाव इंडिया दॅट इज भारत आणि भारत दॅट इज इंडिया असे घटनाकार अधोरेखित करतात. तर आर्टिकल दोन, तीन, चार मध्ये देशाची सीमा ठरवणे, नवीन राज्यांची निर्मिती करणे, त्यांना नावे देणे, त्यांच्या सीमा ठरवणे , नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करणे, त्यांना नावे देणे, त्यांना मूलभूत हक्क आणि अधिकार देणे हे आर्टिकल मध्ये घटनाकार यांनी अधोरेखित केलेले आहेत.
आर्टिकल पाच ते अकरा मध्ये घटनाकाराने देशातील प्रत्येक नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्याचे अधिकार अधोरेखित केले आहे. आर्टिकल बारा ते पस्तीस मध्ये देशातील तमाम नागरिकांना समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषण विरुद्ध हक्क अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, घटनात्मक अधिकार प्रत्येक नागरिकांना या कलमांद्वारे घटनाकाराने भारतीय संविधानात अधोरेखित केले आहे. खरंतर हे एक ते पस्तीस आर्टिकल संविधानाचा मूळ गाभा आहे. परंतु आज संविधान विरोधी शक्ती संविधान संपवण्याची भाषा करून देशातील जनतेला विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायव्यवस्था मूलभूत अधिकार ,कर्तव्य, हक्क संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की त्यांनी देशाचं राष्ट्रग्रंथ म्हणजेच देशाचे संविधानाचे वाचन करणे ते समजून घेणे, त्याचा प्रचार प्रसार देशातील जनतेत करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव, संयोजक समिती सदस्य उमेश कापसे, पालघर जिल्हा महिला महासचिव सुमतीताई कांबळे, काँग्रेसचे जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार, राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे जव्हार तालुकाध्यक्ष कल्पेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा व चौका चौकात संविधानाची महती, संविधानातील मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य उपस्थित नागरिकांना समजावून सांगण्याची जबाबदारी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा युवा संपर्कप्रमुख
ॲड. अजिंक्य मस्के यांनी पार पाडली.
यावेळी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरशद खान, राष्ट्रीय महासचिव जगदीश राऊत, संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष भरत महाले, संघटनेचे राष्ट्रीय सचिव बिंबेश जाधव , संघटनेचे राष्ट्रीय सहसचिव लहाणू डोबा, राष्ट्रीय सदस्य भारती ताई राऊत, राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई मोरे, राष्ट्रीय सदस्य भावेश दिवेकर, मोहिनी जाधव, चंद्रसेन ठाकूर तसेच संयोजक समिती सदस्य शिवप्रसाद कांबळे, रोहित चौधरी, स्नेहाताई जाधव, आशाताई गवई, संयोजक समिती सदस्य तथा अध्यक्ष – अनुसूचित जमाती विभाग महाराष्ट्र कमलाकर माळी, संयोजक समिती सदस्य तथा पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत , संयोजक समिती सदस्य लक्ष्मण रखमे, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वाहिदा ताई शेख , संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पालघर जिल्हा उपाध्यक्ष वसीम काझी , जिल्हा सचिव रमाकांत गायकवाड, पालघर जिल्हा सचिव जीभाऊ अहिरे, महिला जिल्हा सचिव शितल ताई ठाकरे, पालघर जिल्हा वरिष्ठ सल्लागार सदाशिव मोरे, तसेच मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा, डहाणू तालुका अध्यक्ष सिराज शेख, डहाणू तालुका उपाध्यक्ष प्रसन्ना जाधव, पालघर तालुका उपाध्यक्ष अर्जुन बशिरे, रमेश जोरावर , दगडू पवार, तालुका सहसचिव देविदास बर्वे, जव्हार तालुका सह संपर्क प्रमुख देविदास दिघा, वाणगाव शहर अध्यक्ष सागर राऊत, वाणगाव शहर उपाध्यक्ष गिरीधारी बिस्वाल, वाणगाव शहर महिला युवा अध्यक्ष शाहीन शेख, वाणगाव शहर महिला उपाध्यक्ष सोनाली ताई जाधव, कापशी शाखा अध्यक्ष गणेश दुबळा, सफाळे विभाग उपाध्यक्ष वसंत बोराडे , सफाळे विभाग कार्यकारणी सुदाम सर्जेराव, संतोष रुके , अभिनय कदम, सफाळे विभाग कार्यकारणी संगीता बर्वे, रिचा कापसे, वैशाली तरे, अशोक निकम, प्रणय मोरे व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.