स्थानिक स्वराज्य संस्थेत “येड्यांची जत्रा” नकोच…महाराष्ट्रातील जनतेची आग्रही मागणी
🎯 सबंध महाराष्ट्र पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
लोकसभा,विधानसभा पाठोपाठ आता येणारे महाराष्ट्रातील नवीन सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालणार आहे हे आता सिद्ध झाले आहे,महाराष्ट्रातील जनतेने या वेळेस पहिल्यांदा सरकार वर न राग काढता विरोधी पक्षालाच आपला निशाणा केला…असो…
गेली अनेक वर्षे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण हे नेत्या भोवतीच फिरत होते परंतु आता नेत्यांच्या निवडणुका पार पडल्या असुन येथून पुढील सर्व निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असणार आहेत…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी कार्यकर्ते करत असुन तशी फिल्डींग आप आपल्या राजकीय “गॉडफादर” कडे लावताना दिसत आहेत,या मध्ये प्रामुख्याने महानगर पालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पालिका,नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणुका लवकरच पार पडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका पार पाडताना महत्वाच्या नेत्यांची दमछाक होणार आहे,कारण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी वेळी अनेक युवा कार्यकर्त्यांना याच नेत्यांनी शब्द दिला असल्या कारणा मुळे येथे हि “बंडखोरी” होण्याचे चान्सेस जास्त दिसून येत आहेत…
परंतु या वेळी नेत्यांनी चारित्र्यवान आणि कॉलिफिकेशन (उच्चशिक्षित) असणारेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे गरजेचे आहे,या साठी प्रत्येक उमेदवाराने कमीत कमी आपले ग्रज्युशन पूर्ण केलेले असावे,उगाच मोकार येड्यांची जत्रा स्थानिक स्वराज्य संस्थेत होता कामा नये,अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या सर्व निवडणुकांची महाराष्ट्रातील जनता मात्र आतुरतेने वाट पाहत आहे हे मात्र तितकेच खरे…