महाराष्ट्र

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार “गंभीर” कधी होणार…?

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

महायुतीच्या नेत्यापैकी प्रमुख असलेल्या अजित पवार यांनी परवा एका पत्रकार परिषदेत बोलताना असे म्हणाले की,महाराष्ट्रातील एक गठ्ठा मुस्लिम मते हि महाविकास आघाडी कडे गेली,असे कारण सांगत महायुतीला मिळालेल्या कमी जागांचे खापर मुस्लिम समाजावर फोडून ते मोकळे झाले,या मध्ये अजित पवार यांनी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने दाबली ती म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतापेक्षा मराठा समाजाची एक गठ्ठा मते जी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे राहिली ती…

मुस्लिम समाजावर खापर फोडून मनोज जरांगे पाटील यांचे हि महत्व कमी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार यांनी केला असुन आता इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले सुध्दा हिच भुमिका पार पाडताना दिसत आहेत…

या मध्ये महायुतीचा एक डाव असा असु शकतो की,आपल्या पासुन दुर गेलेली मराठा समाजाची मते हि मुस्लिम द्वेष पसरवून परत मिळवता येतील म्हणून हि प्रयत्न असेल…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खास आकर्षण ठरले ते मराठा समाजाचेच,कारण मुस्लिम समाजा पेक्षा मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जी ताकत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभी केली ती न भुतो न भविष्यती अशीच होती,मुस्लिम समाजापेक्षा मराठा समाजाने झाडून मतदान महाविकास आघाडीला दिले…

मराठा,मुस्लिम,दलित आणि कुणबी मराठा समाज जर असाच एकत्र राहिला तर महायुतीच्या मी मी म्हणणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल असे चित्र सध्या दिसत असल्यामुळे मुस्लिम द्वेष पसरवून vote zihad चा ढोल महायुती वाजवू शकते…

मराठा आरक्षणाचा मुद्दा वाटतोय तितका सोपा नाही आहे,महाराष्ट्र सरकार ने हा विषय सिरीयसली घेऊन सोडवायचा प्रयत्न करावा असे वाटत असताना ओबीसी समाज बांधव उठून बसले आहेत,मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्र सरकार असेच भिजत ठेवत असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा धक्कादायक निकाल महाराष्ट्रात लागतील एवढे मात्र निश्चित खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button