महाराष्ट्र

मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदानींना गिफ्ट; वर्षा गायकवाड यांचा आरोप

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मुंबई – 14 जून : मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले असल्याचा आरोप केला आहे. कोणतीही निविदा प्रक्रीया न राबवता कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला भेट म्हणून दिली असून हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला आहे. भाजपा सरकार अदानींवर पुन्हा मेहरबान झालं असून अदानींसाठी सत्ता राबवली जात असल्याचा घणाघातही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.                                      

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदानी (मोदी आणि अदानी) अँड कंपनीला मुंबई गिळायची आहे. त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची त्याची तयारी आहे. मुंबईतील सर्व सरकारी जमीन अदानीची आहे,असा प्रकार सुरु आहे. भाजप सरकारने अदानींसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांच्या अधिकारावर गदा आणली. त्यानंतर धारावी पुनर्वसनाच्या नावावर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी व जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लाटण्याचा डाव आखला.      
                     
आता कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळंकृत करायची आहे. कुणालाही विश्वासात न घेता, कुठलीही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदानींच्या घशात घातला जात आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला नाममात्र दराने हा भूखंड भेट दिला जात आहे. मात्र हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button