बिनकामाचे फडणवीस…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
आपणा सर्वांना आठवत असेल की 2014 च्या पूर्वी एकनाथ खडसे यांच्या मागे पुढे फिरणारे फडणवीस भाजपा मध्ये आयात केलेल्या आमदारांना एकत्र करत आपला गट मजबुत करण्याच्या प्रयत्नात ते राजकीय वजन गमावून बसले आणि आता “मला मोकळे करा” असे म्हणत राष्ट्रीय सहानुभूती च्या प्रतिक्षेत आहेत…
हे सगळे घडत असताना श्रीकांत भारतीय या एकमेव सल्लागारा ने दिलेले सल्ले आणि चुकीचे रिपोर्ट फडणवीस यांना “अनाजी पंत” बनवून सोडेल असे वाटले नव्हते…
आपला गट मजबुत करत असताना फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील,गोपीचंद पडळकर,मोहित कंबोज,चित्रा वाघ,नवनीत राणा,निलेश राणे,प्रवीण दरेकर या “वाचाळवीर” लोकांमुळे अडचणीत येत मुळचे भाजपायी असलेले विनोद तावडे,पंकजा मुंडे,एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार ह्यांना मनोमनी दुखावत आपल्या पासुन दुर केले…

शरद पवार यांच्याच राजकारणाची कॉपी करणारे फडणवीस मात्र राजकारणाच्या दलदलीत फसत गेले याचे कारण हि अगदी सोप्पे आहे,महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याची खडानखडा माहिती असलेले शरद पवार हे सर्व समावेशक राजकारण करण्यात पटाईत आहेत तर फडणवीस हे अहंकाराने भरलेले…
तसे पहायला गेल्यास “लोकनेता” या शब्दाची ॲलर्जी असलेल्या भाजपा ला फडणवीस यांनीच आयात लोकनेत्यांचा भरणा करत पक्षाच्या ध्येय धोरणांना केराची टोपली दाखवली होती…
महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा महायुती च जिंकेल अशा बाता मारणारे फडणवीस सध्या तरी बॅकफूट वर फेकले गेले आहेत अशातच भाजपा च्या राष्ट्रीय पातळीवरील समितीने विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन निवड केली तर फडणवीस यांचे काम आणखीन घोटाळ्यात येणार आहे…
कारण विनोद तावडे हे सध्या भाजपा चे महासचिव म्हणुन काम पाहत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहेत,गेल्या वर्षी झालेल्या INDIA आघाडीतून बिहारचे नितीश कुमार यांना NDA मध्ये आणण्यात विनोद तावडे यांचा मोठा वाटा असल्याने फडणवीस यांची पुढील राजकीय कारकीर्द हळु हळू का होईना संपुष्टात येइल असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे…



