पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्प भुसुरंग स्फोटामुळे नुकसान झालेल्या घरमालकांना एल अँड टी कंपनीकडून नुकसान भरपाईचे धनादेश वाटप

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
पालघर जिल्ह्यातील किरईपाडा विराथन बुद्रुक आणि जलसार ग्रामपंचायत हद्दीतील मेघराज डोंगरातून मुंबई अहमदाबादकडे जाणारा जलद गती बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भुसुरुंग स्फोटामुळे या भागातील नुकसान झालेल्या बाधित घरमालकांना नुकसान भरपाईचे धनादेश देण्यास एल अँड टी कंपनी मार्फत सुरुवात करण्यात आली आहे.
जलसार ग्रामपंचायत आणि विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील मेघराज डोंगर फोडून बोगदा तयार करण्यासाठी एल अँड टी कंपनी मार्फत भूसुरुंग स्पोर्ट करण्यात आले होते. या भुसुरुंग स्फोटाच्या क्षमतेमुळे तलावपाडा, चाफेवाडी, नांदगडी, डोंगरीपाडा,वैतीपाडा माडीघर, किरईपाडा, जलसार या गावांमधील 500 पेक्षा जास्त घरांच्या भिंतीना भेगा जाऊन घरमालकांचे नुकसान झाले होते.

याबाबत या भागातील ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने नुकसान भरपाईची मागणी एल अँड टी कंपनी कडे केली होती.या मागणीवरून एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रेहब कन्स्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड कंपनीकडून बाधित नुकसान झालेल्या सर्व घरांचा सर्वे करून एल अँड टी कंपनी कडे सुपूर्त केला होता.यावर त्वरित अंमलबजावणी करून भूसुरंग स्फोटामुळे नुकसान झालेल्या किरईपाडा येथील 200 घरमालकांना आणि विराथन बुद्रुक येथील 66 घर मालकांना एल अँड टी कंपनीचे अधिकारी अमल घारा आणि बिश्वनाथ मुथुली यांच्या पुढाकारामुळे नुकसान भरपाईचे धनादेश वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
लाभार्थीना हे धनादेश विराथन बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच सौ.अंजली किणी आणि जलसार ग्रामपंचायत सरपंच सौ.साक्षी गावड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.



