महाराष्ट्र

करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी ओढे नाले साफ सफाई करावे.- बानू फारुक जमादार माजी नगरसेविका क,न प

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले ओढे यांची साफसफाई करावी अशी मागणी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेविका बानू फारूक जमादार यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी करमाळा यांच्याकडे केली आहे

जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी शहरात मान्सूनपूर्व ओढे नाले याची स्वच्छता करण्यात येते परंतु आत्ता पर्यंत नगरपालिकेने ओढे नाले साफ सफाई करण्यास सुरुवात केलेली नाही सध्या अवकाळी पाऊस पडत असून शहरातील नाले ओढ्यामध्ये अत्यंत घाण झालेली असून काही ठिकाणी वेड्या बाबळी ची झाडे मोठी झालेली दिसून येत आहे

तसेच व ओढ्यातही प्रचंड प्रमाणात घाण झालेली दिसून येत आहे परंतु नगरपालिकेला अद्याप पर्यंत नालेसफाई बाबत कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे सन 2008 पासून करमाळा शहरातील ओढ्या नाल्यात पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत त्यामुळे नगरपालिकेने याबाबत सतर्क राहून त्वरित करमाळा शहरातील ओढे नालेची त्वरित साफसफाई करावी

तसेच करमाळा नगरपालिकेने आपत्कालीन विभाग कार्यान्वित करावा व त्या ठिकाणी जबाबदार कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी व शहरातील नागरिकांना आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्यासाठी करमाळा नगरपालिकेचा लँडलाईन त्वरित चालू करण्यात यावा व नागरिकांसाठी फोन नंबर उपलब्ध करून देण्यात यावा तसेच मान्सूनपूर्व काळामध्ये कोणतीही जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये म्हणून याची दक्षता घेण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी सोलापूर आमदार करमाळा विधानसभा यांना देण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button