महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषदेवर नागरिकांचा पाण्यासाठी धडक मोर्चापीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मौजे अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे गेली महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे अकलूज नगरपरिषदअंतर्गत असणाऱ्या नागरिकांच्या नळांना पाणी येत नसल्याने याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारी दूर केल्या नाहीत

तसेच पाणीटंचाईमुळे नागरिकांनी अकलूज नगरपरिषदेकडे पाणी टँकरची मागणी करूनही नागरिकांना पाणी टँकर वेळेत दिले जात नाहीत अशा तक्रारी काही नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्याकडे केल्या असता सोमनाथ भोसले यांनी सर्व महिलांना सोबत घेऊन अकलूज नगरपरिषद कार्यालयाबाहेर घोषणाबाजी व बोंबाबोंब करून नगरपरिषदेचा निषेध नोंदवून नागरिकांना त्वरित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली

यावेळी पाण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस मदभावी व इतर पोलीस कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले यावेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पाटबंधारे विभागाकडून येणारे पाणी न आल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे सांगून लवकरच अकलूज माळेवाडी भागातील नागरिकांना नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची पाणीटंचाई दूर केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी उपस्थित महिला नागरिक व पदाधिकारी यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर वातावरण शांत झाले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड तालुका उपाध्यक्ष सदानंद बनसोडे मिलिंद चव्हाण तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे युवक शहराध्यक्ष अशोक कोळी अनिकेत शिंदे अर्जुन कोळी अरुण कोळी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड सुरेश कोळी यांचेसह मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button