शासनाच्या मोफत शिधापत्रिकेवरील धान्याचा उडाला बोजवारा-फेब्रुवारी उजाडला तरी जानेवारी चा माल अद्याप मिळाला नाही

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
मागील महिन्यात केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांना 2023 या वर्षात शिधापत्रिकेवरील धान्य मानसी 5 किलो देण्याचे आश्वासन दिले मात्र फेब्रुवारी 2023 महिना उजाडला तरी ही अद्याप जानेवारी 2023 चा माल शिधापत्रिकाधारकांना अद्याप मिळाला नसल्याने गोरगरीब जनतेत उलट सुलट चर्चा चालू आहे यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना महिन्यातून दोन वेळा धान्य उपलब्ध होत होते त्यामधून एक वेळा मोफत आणि एक वेळा विकत असे धान्य उपलब्ध होत होते परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार 2023 मध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे दीड महिना उलटला तरी अद्याप धान्याचा पत्ता नाही तसेच मोफत धान्याबरोबर विकतचे हे धान्य उपलब्ध व्हावे अशी शिधापत्रिकाधारकातून मागणी होत आहे सन 2023 च्या धान्य वाटपा च्या संदर्भात रेशन दुकानदारास विचारणा केली असता ते म्हणाले की माल येऊन पंधरा दिवस झाले आहेत मात्र धान्य वाटप करण्यासाठी लागणारी मशीन बंद असल्याने अद्याप वाटप केले नसल्याचे सांगण्यात आले मागील तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार 4 G ची मशीन देण्याची मागणी केली आहे मात्र शासन आणि प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी अद्याप रेशन दुकानदारास 4 G च्या मशिनी उपलब्ध झाल्या नाहीत जर या मशीन तातडीने दिल्यास गोरगरीब जनतेला शिधापत्रिकेवरील माल तातडीने मिळण्याची व्यवस्था होईल त्याकरता प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लवकरात लवकर मशीन उपलब्ध करून द्याव्यात असेही शिधापत्रिका धारकातून बोलले जात आहे.



