महाराष्ट्र

उजनी जलाशयात कळाशी कुगाव दरम्यान बुडालेल्या बोटीतील सहा जण अध्याप देखील बेपत्ता शोधकार्य युद्धपातळीवर सुरू

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

उजनी (भीमा) नदीच्या पात्रात काल सायंकाळच्या दरम्यान करमाळा तालुक्यातील कुगाव येथून कळाशी ता इंदापूर अशी प्रवासी वाहतूक करणारी बोट वादळी वार्‍याने उलथून झालेल्या अपघातात बेपत्ता असलेले सहा जण अद्याप देखील बेपत्ता असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

झरे ता करमाळा येथून कळाशी ता इंदापूर येथील माहेरी पती व दोन लेकरासह जाणाऱ्या जाधव परिवारातील पती पत्नी सह त्यांचे दोन चिमुकले देखील गायब आहेत.या कुटुबांचे लहानग्या लेकरासमेवतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हळहळ व्यक्त होत आहे.

आदिनाथ सह साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे हा सोळा वर्षाचा युवक काल पासुन बेपत्ता असून स्वतः चेअरमन धनंजय डोंगरे बोटीतून आपल्या मुलाचा शोध घेतानचे दृष्य मन हेलावून टाकत होते

काल झालेल्या या अपघातात कुगाव येथील गौरव धनंजय डोंगरे,वय 16 झरे येथील गोकुळ दत्तात्रय जाधव, वय (३०) पत्नी कोमल गोकूळ जाधव वय (२५) शुभम गोकुळ जाधव वय (दिड वर्ष) माहि गोकुळ जाधव वय 3 (वर्ष) हे संपूर्ण कुटुंब कुगाव येथील बोटचालक अनुराग अवघडे वय (35) हे अद्याप देखील बेपत्ता आहेत.

या घटनेची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री, हर्षवर्धन पाटील ,मंत्री दत्तात्रय भरणे ,माजी आमदार नारायण पाटील, आमदार संजय मामा शिंदे ,इंदापूर चे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे हे घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

एन डि आर एफ चे जवान, स्थानिक मच्छीमारांकडून शोध कार्य सुरू असून महसूल, पोलीस प्रशासन यांना स्थानिकांचे देखील सहकार्य मिळत आहे.

काल पासुन सायंकाळी पासुन बेपत्ता असलेले सहा पैकी एक जण देखील अढळुन न आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे .जोपर्यंत बेपत्ता असलेले सापडत नाहीत तोपर्यंत शोध मोहीम सुरू राहिल असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button