महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांपैकी तिघांचा बुडून मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :703051640

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी अल्पवयीन मुलांपैकी तीन मुलांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.तर यापैकी एका मुलाने या पाण्यातून बाहेर येऊन आपला जीव वाचवला आहे.

मृत्यू झालेल्या तीन मुलांपैकी दोन सख्खे भाऊ होते.
बोईसर पश्चिमेला असलेल्या गणेश नगर भागात खाजगी जागा असलेल्या एका खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाले होते. या पावसाच्या पाण्यात शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गणेश नगर येथे राहणारे सुरज यादव वय वर्ष (7) धीरज यादव वय वर्ष (11) व अंकित गुप्ता वय वर्ष (10 ) आणि अन्न एक ही चार शाळकरी अल्पवयीन मुले पोहण्यासाठी गेले होते या खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी सुरज जाधव व धीरज जाधव हे दोन सख्खे भाऊ आणि अंकित गुप्ता या तिघांचा या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे.

तर यापैकी एक मुलगा या पाण्यातून आपला जीव वाचवत स्वतःहून पाण्याबाहेर सुखरूपपणे बचावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button