महाराष्ट्रासाठी पुढील आठवडा सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा…

चार महत्वपुर्ण घटनांवर होणार सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी…
चार हि सुनावणी नंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ आणि स्थिर असलेलं शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस यांच्या आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार पाडून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे,त्या नंतर “घर का भेदी लंका ढाये” म्हणत आपल्या घरचाच पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्ये सामील झालेले अजित दादा पवार,रखडलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुका आणि त्यामुळे विधान परिषदेच्या “त्या” 12 आमदारांची न झालेली निवडणुक तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बाबत दिलेला निकाल या सर्व बाबी विचारात घेता देशाचे “सर्वोच्च न्यायालय” याच आठवड्यात महत्वपूर्ण निकाल देणार असल्याने पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त उलथापालथ होण्याची शक्यता टाइम्स न्यूज च्या सुत्रांनी व्यक्त केली…
गेली पाच वर्षे अनेक राजकीय घटनांनी महाराष्ट्रातील जनता होरपळून निघालेली असताना या आठवड्यात लागणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले असुन येणाऱ्या निकालामुळे महायुती आणि महाविकास आघाडी पैकी कुणाचे राजकीय भले होणार आणि कुणाचे राजकीय नुकसान होणार या कडे हि सर्वांचे लक्ष लागले आहे…

⛔ महाराष्ट्रासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा पुढील आठवडा असा असेल…
1) 12 जुलै 2024 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बाबतच्या याचिकेवर सुनावणी…
2) 15 जुलै 2024 रोजी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबतच्या याचिकेवर सुनावणी…
3) 16 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबतच्या याचिकेवर सुनावणी…
4) 19 जुलै 2024 रोजी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रे बाबतच्या निर्णयाच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी…
वरील चार हि निकाल हे सद्यस्थितीतील महाराष्ट्राच्या अनेक राजकीय घटनांवर दुरोगामी परिणाम करणारे असतील असा अंदाज राजकारणातील “प्रकांड पंडित” वर्तवित आहेत हे मात्र तितकेच खरे…



