माता रमाई महिला लेझीम संघाचे सर्वत्र होत आहे कौतुक

माळीनगर प्रतिनिधी रियाज मुलाणी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे अवचित्य साधून यावर्षी राजेश कांबळे सर यांनी माता रमाई लेझीम संघाची स्थापना केली आपली भारतीय संस्कृती जपणे मूळ हेतू त्यांचा होता.
लोककला लेझीम ,ढोल ,ताशा, नष्ट होऊ लागली आहे अलीकडच्या काळात नवी पिढी डी.जे कडे आकर्षित होत चालली आहे २४ तासाकरता डी.जे साठी लाखो रुपये मोजावे लागतात शिवाय जीवित हानी देखील होत आहे हार्ट अटॅक बहिरेपणा लाईट मुळे डोळ्याचे विकार प्रमाण वाढले आहे.परंतु माळीनगर मधिल महिलांनी लेझीम खेळत नवा आदर्श घालून दिला आहे आणि याचमुळे आज माळीनगर सह सर्वच भागात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
यावेळी लेझीम पथकास विशेष सहकार्य वैशाली कांबळे मॅडम, शालु गायकवाड मॅडम, लता काटे मॅडम, वंदना कांबळे मॅडम, तसेच समेश भोसले सर जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी समाजबांधव व माळीनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता.



