राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “आश्वासक” चेहरा…!

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुभंगला गेला त्या वेळी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या च प्रश्नांना उत्तरे देताना कुण्या एका टिव्ही चॅनल च्या पत्रकाराने शरदचंद्र पवार यांना एक खोचक प्रश्न विचारला होता की येथून पुढील काळात आपल्या पक्षाचा “आश्वासक” चेहरा कोण…? आपल्याला आज हि आठवत असेल की विधी न मिनिटाचा वेळ लावत शरदचंद्र पवार यांनी त्यांच्याच स्टाईल मध्ये एक हात वर करत “शरद पवार” असे उत्तर दिले होते…
असो… तर वरील प्रसंगाचा लेखाजोखा आज च का…? तर मित्रांनो 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार या “अवलिया” ला जवळून पाहत असताना एक 84 वर्षाचा तरुण पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रासाठी रात्रीचा दिवस करून जातीयवादी पक्षाला दूर करण्यासाठी धडपडत आहे हे अख्खा महाराष्ट्र बघत आहे…
या पुरोगामी महाराष्ट्रात यशवंतराव ते विलासराव असा मुख्यमंत्री पदाचा “सुवर्णकाळ” पाहिलेली पिढी ज्या वेळी मागे वळून पाहत असेल त्या वेळी “कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र” असे त्यांना नक्कीच वाटत असेल… कारण सहकाराच्या माध्यमातून हरित क्रांती,धवल क्रांती करत अनेक राजकीय नेत्यांनी मोलाचे योगदान या पुरोगामी महाराष्ट्राला दिले…

सहकाराच्या बाबतीत सबंध महाराष्ट्रात अग्रेसर राहिला तो आपला सोलापूर जिल्हा,सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी स्व भाई गणपतराव देशमुख,स्व बाबुराव पाटील अनगरकर,स्व सुधाकरपंत परिचारक,स्व वि गु शिवदारे,स्व ब्रम्हदेव दादा माने,भाई एस एम पाटील अशा किती तरी आपल्या सवंगड्यांना सोबत घेत फक्त विकासच राजकरण केल…
2024 लोकसभा निवडणुकी साठी काल परवा पर्यंत भाजप वासी असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षा कडे उमेदवारीची मागणी केली अन् पक्षाने ती उमेदवारी अक्षरशः नाकारली,हि उमेदवारी नाकारून सबंध सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या इगोला ठेच पोहचवण्याचे काम भाजप ने केले अन् येथून च सुरु झाला जनभावनेचा कानोसा घेण्याचा प्रवास…
दरम्यानच्या काळात धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघ पिंजुन काढत असताना लोकांच्या भावनेचा अक्षरशः उद्रेक झाला,काही ठिकाणी तर मोहिते पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार असेल तरच गावात प्रवेश असा आदरयुक्त दम देखील दिला गेला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने जन्म घेतला,धैर्यशील मोहिते पाटील हे राजकीय वळण घेत असताना पाठीवर “पितामह” विजयसिंह मोहिते पाटील,”कारभारी” जयसिंह मोहिते पाटील यांचा आशीर्वाद तर होताच परंतु शरदचंद्र पवार नावाचा “सह्याद्री” हि धावून आला हे वेगळे सांगायला नको…
आज माढा लोकसभा मतदार संघात जनतेचा खासदार म्हणुन जी छाप धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोडली आहे हे पाहिल्यानंतर भविष्यात सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा “आश्वासक” चेहरा दिल्ली काबीज करण्यासाठी विजयाची “तुतारी” वाजवल्या शिवाय गप्प बसणार नाही हे मात्र तितकेच खरे…



