शेतकऱ्यांचा सण अर्थात बैलपोळ्यावर दुष्काळाचे गडद छाया,,,,, राजा सर्जा ची मिरवणूक मात्र साध्या पद्धतीने

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख
करमाळा प्रतिनिधी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण समजला जाणारा सण म्हणजे बैलपोळा होय सध्या या महत्त्वाच्या सणावर केवळ पावसामुळे बैलपोळ्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे पावसा अभावी करमाळा तालुक्यातील शेतकरी आपल्या राजा सर्जा ची मिरवणूक मात्र साध्या पद्धतीने काढणार आहे
एकेकाळी बैलपोळा म्हणजे शेतकरी राजा खुश होऊन आपल्या राजा सर्जा बैलाची मिरवणूक आपल्या गावामधून वाजत गाजत काढत असे मात्र सध्याचा बैलपोळा या महत्त्वाच्या सणावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे कारण गेली जून महिन्यापासून अद्याप पर्यंत तब्बल चार महिन्याचा कालावधी लोटला तरी पावसाचा म्हणावा तसा कोठेच प्रभाव नाही अर्थात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या सर्जा राजांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट निर्माण झाला आहे या पोटच्या गोळ्याला संभाळायचे म्हणजे चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो मात्र पाऊसच नसल्याने कोठेही चारा नाही अशाही परिस्थितीत आपल्या बैलांच्या निगराणी चे काम सध्या शेतकरी कसाबसा करीत आहे
त्यातच पाऊस नाही त्यामुळे चारा नाही पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था उजनी धरण कमालीचे आटले आहे गावातील सर्व तळे विहिरी नाले कोरडे ठणठणीत पडले आहे अशाही परिस्थितीत शेतकरी राजा उसनवारी करून आपल्या राजा सर्जा ची मिरवणूक न काढता फक्त रंगरंगोटी तसेच बैलांना सजवून बैलपोळा कसातरी करीत आहे त्यातच शासनाने अद्याप पर्यंत शेतकरी राजाला नुकसान भरपाई म्हणून एक दमडीही दिली नाही अशाही परिस्थितीत चेहऱ्यावर हास्य ठेवून आपल्या राजा सर्जा ची मिरवणूक न काढता घरातच नैवेद्य दाखवून साध्या पद्धतीने बैलपोळा सध्या शेतकरी राजा करीत आहे
गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या या शासनाला शेतकऱ्याची किंमत केव्हा कळणार
भारतीय अर्थव्यवस्था सध्या शेतकरी वर्गावर असून गेली किती वर्षापासून शेतकरी वर्ग यांना त्या कारणाने अनेक नानाविध समस्यांना तोंड देत आहे कधी पीएम किसान योजना तर कधी आसमानी संकट आशा विविध पद्धतीने शेतकरी वर्ग आज भरडला जात आहे शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही गेली चार महिन्यापासून शासन मात्र नुकसान भरपाई साठी शेतकऱ्याला फक्त घोषणाबाजी व आश्वासनाची खैरात देत आहे
शेतकरी वर्ग मात्र शासनाच्या दरबारी हेलपाटे मारूनच पुरता गहाळ झाला आहे शेजारील जिल्ह्यात दमदार नेते असल्यामुळे तेथील शेतकरी वर्गांना नुकसान भरपाई मिळाली मात्र करमाळा तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तेव्हा अशा गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या शासनाला तालुक्यातील शेतकऱ्यांची दया कधी येणार मागील काही दिवसात जर शासनाने शेतकऱ्यांना काही ना काही स्वरूपात नुकसान भरपाई दिली असती तर शेतकरी वर्गाने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला असता मात्र शासनाने अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही



