विशेष

उमरड गावातील अवैध दारू दुकाने व जुगार बंद करणार – पोलीस निरीक्षक घुगे साहेब

करमाळा प्रतिनिधी:

अवैध दारू जुगार बंद झाली पाहिजे या विषयावरती मार्गदर्शन करताना उमरड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत असताना जर गावकऱ्यांची दारू जुगार बंद करण्याची मागणी आहे तर पोलीस यंत्रणा गावकऱ्यांच्या पाठीशी राहील मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो उमरड गावातील दारू जुगार दुकाने बंद करण्यात येतील यावेळी बोलताना तरुण मुलांनी व्यायाम केला पाहिजे अभ्यासावरती लक्ष दिले पाहिजे आई-वडिलांनी विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल देऊ नये मोबाईल मध्ये नको ते पाहायला मिळते त्यामुळे तरुण पिढी बिघडते ताण तणाव कमी करण्यासाठी ग्राउंड वर व्यायाम करावा.यावेळेस गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले दारू च्या आहारी गेलेल्या लोकांचे दारू सोडण्यासाठी समुपदेशन केले पाहिजे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक म्हणजे एक प्रकारचा आजारच आहे अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम म्हणालेउमरड गावातील अवैद्य दारू धंदे पाच महिने बंद झाले होते परंतु जेऊर पोलिस स्टेशन दूर लक्ष करत असल्या मुळे चालू झाले करमाळा पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी स्वतः लक्ष देऊन उमरड गावातील दारू व जुगार बंद केली पाहिजे यावर पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी गावकऱ्यांना अवैद्य दारू दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले.प्राध्यापक नंदकिशोर वोलटे सर यांनी अवैद्य दारू विक्री बंद झालीच पाहिजे असे ठणकावून सांगितले सरांच्या भाषणाचा चांगलाच प्रभाव अधिकाऱ्यांवर पडला.शबाना शेख व शिंदे बाई यांनी दारुड्या नवऱ्यापासून मुलापासूनआमचं जगणं मुश्किल झालं आहे दारू पिऊन आल्यानंतर भाकरी कालवन बाहेर फेकून दिले जातात मग आम्ही जगावे कसे हनमार करतात म्हणून माहेरी पळूनन जावे लागते गडी माणसं दारू पिऊन सर्व कामाचा पैसा घालवतात मग वयाभवात आलेल्या मुलींची लग्न करायची कशीअशा विविध प्रश्नाने आमचं जगणं मुश्किल झाल आहे त्यामुळे आपण ताबडतोब गावातील दारू धंदे बंद करावेतअसे पोलीस निरीक्षण घुगे साहेब यांच्यासमोर ठणकावून भाषण करून सांगितले.या वेळेस उपस्तीत जनार्धन मारकड. गणेश चौधरी,प्रमोद कुलकर्णी,विलास बदे,नामदेव कोठावळे,संदीप मारकड,समाधान वलटे,निलेश चौधरी,ज्योतीराम वलटे,श्रीमान चौधरी,दासा पाखरे,दिगंबर मार्कड,भास्कर पडवळे,श्रीकांत मारकड,चांगदेव चौधारी,सत्यवान पाटील,चंद्रशेखर पाटील,दगडू हुलगे,रामा बदे,सुगर बदे , आदी बहुसंख्यनागरिक व महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नंदकिशोर वलटे सर यांनी केले आभार पाखरे गुरुजी यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button