सफाळे परिसरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा… हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :703051640
आदिवासी हक्क व अधिकार विचार मंच आणि नारोडा-सफाळे परिसराच्या वतीने रविवारी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमात वैशाली काळे, पार्वती बोंबाडी, निर्मला पांढरे, शिल्पा बारिया, घारे, प्रणाली प्रमोद सांबरे, जया खिलारे, वनिता रणसिंग, विजया गावड, सारिका मालकरी, सुमा मेढा, उज्वला गावड, मनस्वी पाटील, माधुरी मधुकर वरठा, रेखा विनोद वरठा, कुंदा नरू गुंड, संगीता पिलेना, विमल परब, खुशी जाधव, वंदना खैराडी, आकांक्षा खैराडी, रोहिणी बोंबाडी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी समाजातील महिलांचे स्थान, सशक्तीकरण आणि सामाजिक सहभाग याबाबत आपले विचार मांडले. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशीराम वरठा, नितीन बोंबाडे, प्रशिल वरठा, प्रमोद सांबरे, दीपक लाडे, अविनाश भोईर, किसन बोंबाडी, संदीप कवळी, दाजी गायकवाड, गणेश गावड, गौरांग सांबरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.



