महाराष्ट्र

माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे व लबाडीचे आहे, मला न्याय मिळावा,,,,, वडशिवणे येथील सहशिक्षक धनंजय नागणे यांची एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

माझ्यावर करमाळा पोलीस स्टेशन येथे केलेली एफ आय आर चुकीची असून माझ्यावर झालेले आरोप बिन बुडाचे व लबाडीचे आहे मला बदनाम करण्याचा संस्थेच्या मुख्याध्यापकाचा डाव आहे याबाबत मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी वडशिवणे येथील सहशिक्षक धनंजय नागणे यांनी पत्रकारांना दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे

पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्री नागणे यांनी पुढे असे म्हटले आहे की मी श्री धनंजय नागणे वडशिवने येथील श्री अजित दादा पवार विद्यालयात 1986 पासून आज तागायत सहशिक्षक गणित या विषयाकरिता सेवेमध्ये आहे माझ्या शिक्षकाच्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या शाळेत विरोधात कसलाही गुन्हा आजपर्यंत दाखल झालेला नाही मात्र संस्थेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी व पालकांना हाताशी धरून माझ्यावर खोटी एफ आय आर दाखल केली आहे

मी वडशिवणीच्या विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गावर गणित विषयाचे अध्यापन करीत असताना यश दरगुडे हा विद्यार्थी वर्गात काहीच लिहीत नसल्याने मी त्या विद्यार्थ्याला शाळेबाहेर काढले तरी देखील मुख्याध्यापकाने त्या विद्यार्थ्याला शाळेत बसविले त्याच्यानंतर शाळा सुटल्यानंतर मी वर्तमानपत्रात शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची बातमी वाचली बातमी वाचून मला धक्का बसला मी आजपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही मारहाण केली नाही मात्र उलट पणे माझ्या विरोधात मुख्याध्यापक यांनी सदरचा विद्यार्थी व पालकाला हाताशी धरून माझ्या विरोधात षडयंत्र रचुन माझी उघडपणे बदनामी केली आहे सदर प्रकरणाची चौकशी व्हावी मला व माझ्या कुटुंबाला सदर संस्थेच्या मुख्याध्यापकापासून मला धोका आहे याबाबत मला न्याय मिळावा अशी मागणी श्री नागणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button