महाराष्ट्र

माढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घंटानाद व हलगीनाद आंदोलन

प्रतिनिधि … रियाज मुलाणी
मो.9921500780

माढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि.२४/०९/२०२४ रोजी माढा तहसिल कार्यालया समोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद व हलगीनाद आंदोलन करण्यात आले.

सोलापूर जिल्हा अतिवृष्टीतून वगळण्यात आला आहे त्याचा समावेश करावा,खरीप हंगाम 2023 मधील पिक विम्यातून कांदा व तूर व इतर वगळलेली पिके यांचा समावेश करावा तसेच शेतकऱ्यांचा खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करावी,पी एम किसान पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावा,जात पडताळणी करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे तो थांबून विना मोबदला कुणबी प्रमाणपत्र द्यावे ,उडीद हमीभावाने कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करावे, अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी बी डी कदम, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, उमेश पळशे, तहसीलदार विनोद रणवरे, तसेच महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते मालोजी आडकर सर,कार्याध्यक्ष आदिनाथ परत,जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे,माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड,तालुका सचिव इसाक काझी,जेष्ठ नागरिक दत्ता आण्णा जाधव,सोमेश्वर शेंडे,नवनाथ उबाळे,हनुमंत गवळी,पप्पु डूचाळ,सज्जन गोरे, श्रीकृष्ण देशमुख, आजिनाथ परबत,आदींसह स्वभीमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button