शहर

26,48,800 रुपयांच्या मुद्देमालासह पान मसाल्याची विक्री व वाहतूक करणाऱ्या आरोपीला कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केले जेरबंद

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.

मानवी आरोग्यास हानिकारक असलेला पान मसाला महाराष्ट्र शासनाने अधिसूचना द्वारे वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध केला असताना देखील पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील धुंदलवाडी ते उधवा रोड वरील हळदपाडा गाव हद्दीत या पान मसाल्याची विक्री व वाहतूक करणारा एक आरोपी सह 26 लाख 48 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला बुधवारी यश आले आहे.

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील धुंदलवाडी ते उधवा रोड वरील हळदपाडा गाव हद्दीत बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी MH-48 CB-5708 हा लाल रंगाचा आईसर टेम्पो व त्याचा चालक मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध लादलेल्या पान मसाल्याची विक्री व वाहतूक करत आहेत. अशी गोपनीय माहिती सूत्रांकडून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना प्राप्त झाली होती.

या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक संदीप नागरे, पोलीस हवालदार एस आर भोगाडे यांनी घटनास्थळी बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी धाड टाकून टेम्पो चालक सुशील सिताराम सहानी वय वर्ष 35 राहणार काश्मीरा मिरा रोड मूळचा राहणारा बिहार राज्यातला याला अटक करून त्याच्या ताब्यातील 4 लाख 36 हजार 800 रुपयांचा हॉट पान मसाला, तसेच 2 लाख 18 हजार 400 रुपयांचा एस एस के तंबाखूची 2912 बंद पॉकेट व 5 लाख 54 हजार 400 रुपयांची 3960 बंद पॉकेट व 7 लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा टेम्पो असा एकूण 26 लाख 48 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कासा पोलिसांना यश आले आहे. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा कासा पोलीस कसून शोध घेत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button