शहर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण राज्यात भगवा सप्ताहचे आयोजन.

टाईम्स9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

गाव तिथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यासाठी जे काम त्यांनी केले त्याची उजळणी व शिवसेनेचा भगवा झंजावात घराघरात निर्माण करण्याकरता भगवा सप्ताह दरम्यान शिवसैनिकांनी स्वतःला झोकुन गावागावात कार्यक्रम राबवावे. या नियोजनाकरिता शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी पालघर विधानसभा जिल्हाप्रमुख विकास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

या बैठकीला सभापती शैला कोलेकर,उपजिल्हा प्रमुख राजेश कुटे,युवा सेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य परीक्षित पाटील, सिद्धेश घरत युवासेना जिह्वा समन्व्यक,महिला आघाडी तालुका संघटक मनिषा पिंपळे उपतालुका संघटीका जयमाला चुरी ,अनुजा तरे तालुकाप्रमुख गिरीश राऊत ,पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख मनोज संखे,समन्व्यक मोहन राणे, युवासेना तालुकाअधिकारी दिपक मोरे ,शहर युवधिकारी निमिष पाटील ,पालघर शहरप्रमुख भूषण संखे, जयंद्र दुबळा डहाणू तालुका संघटक, उपतालुकाप्रमुख बळवंत पाटील, रामदास पाटील,नगरसेवक कैलास म्हात्रे, संजय गायकवाड, शाखाप्रमुख तुषार पाटील,विभाग प्रमुख सुमित ठाकूर, प्रतीक पाटील, कृतार्थ पाटील इतर कार्यकर्ते शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button