महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात घुमणार “तुतारी” चा आवाज,माळशिरस तालुक्याचे “कारभारी” जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले राष्ट्रवादी चे संकेत…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

जसजशी वातावरणात उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशी लोकसभेच्या निवडणुकीचे वारे हि जोरात वाहत असून,निवडणुक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार सबंध भारतामध्ये राजकीय वातावरण देखील तापत असून जिकडे तिकडे चोहीकडे फक्त राजकीय चर्चेला “उधाण” येत आहे…

भाजपा ने दिलेल्या अब की बार 400 पार या घोषणेला महाराष्ट्रातल्या सांगली,सोलापूर,सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात तरी दणका बसू शकतो अशी परिस्थिती निर्माण होत असुन,भाजपा ने केलेल्या तिकिट वाटपाचा सावळा गोंधळ आणि यामुळेच नाराज झालेल्या जनतेने मनासारखा उमेदवार न दिल्याने निवडणुकीची सर्व सुत्रे जनतेनेच्या हाती गेल्याचे चित्र पश्चिम महाराष्ट्रातून तरी दिसत आहेत…

भाजपा ने आत्ता पर्यंत केलेल्या तिकिट वाटपामुळे बहुतांश जागी गोंधळ निर्माण झाला असुन त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या माढा लोकसभा मतदार संघात बंडाळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत,2009 साली अस्तित्त्वात आलेला माढा लोकसभा मतदार संघ हा कायम चर्चेचा विषय ठरला असून,या लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील यांचे प्राबल्य जास्त असुन देखील भाजपा ने येथे फलटण च्या रणजीत सिंह निंबाळकर यांना “फिर से” उमेदवारी देत एकच गोंधळ निर्माण केल्यामुळे इच्छुक असलेल्या मोहिते पाटील गटाची नाराजी भाजपा ला महागात पडण्याची शक्यता दिसुन येत आहे,अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अकलूजच्या “शिवरत्न” वर दाखल होत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती “तुतारी” मिळण्याचे सुतोवाच स्वतः माळशिरस तालुक्याचे “कारभारी” जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केल्याने एक नवीनच राजकीय ट्विस्ट निर्माण झाल्याने भाजपा च्या गोटात खळबळ माजली आहे…

तर गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा ने सोलापूर लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार न देता मतदार संघाची नाराजी ओढवून घेतली असून,याच्या विपरीत परिस्थिती सांगली आणि सातारा लोकसभेचे नसुन सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना देखील दिल्ली येथे तीन दिवस मुक्कामी ताटकळत ठेवण्याचे पाप भाजपा च्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा भाजपा वर नाराज असल्याचे सोशल मीडिया द्वारे दिसत आहे,या पैकी काही कार्यकर्त्यानी तर भाजपा चे राजीनामे हि दिले आहेत असे बोलले जात आहे…

“यंदा बघतोच तु कसा आमदार होतो” या वाक्यामुळे अडचणीत आलेल्या अजित पवारांची अवस्था सुद्धा वेगळी नसून हर्शवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ह्या हि काही प्रमाणात अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे…

त्यामुळेच की काय अब की बार 400 पार हे भाजपा ने दिलेली घोषणा फुसकी ठरण्याची चिन्हे दिसू लागल्याने पश्चिम महाराष्ट्रातून भाजप गायब होइल असे हि जनतेतून बोलले जात आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button