महाराष्ट्र

करमाळा शहरात आज एका व्यक्तीने चक्क मतदान केंद्राच्या ठिकाणी ईव्हीएम मशीन फोडली काही काळ करमाळा शहरात तणावाचे वातावरण मशीन फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा अंतर्गत करमाळा विधानसभा मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता आज करमाळा शहरातील कानाड गल्ली समोरील शाळा क्रमांक दोन बूथ क्रमांक 90 या मतदान कक्षावर आज एका तरुणाने चक्क ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला सदरचा प्रकार आज शाळा नंबर 2 मतदान केंद्रामध्ये झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते सदरची घटना घडताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी त्यांनी फोडलेली ईव्ही एम मशीन सील केली व नंतर नवीन मशीन मतदाना करिता ठेवली

तसेच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तत्पर्तने मतदान केंद्राला भेट देऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे सदर आरोपीचे नाव आप्पा उर्फ जयवंत दिलीप कांबळे असल्याचे समजते सदर तरुण हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे सदर व्यक्ती हा पाच वाजून 55 मिनिटांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला होता त्यावेळेस त्याने त्याच्यापाशी दडवून ठेवलेल्या हातोड्याने मशीनवर तीनदा हल्ला चढविला सदर घटनेने काही काळ मतदान थांबविले होते मात्र सदर आरोपीला अटक केल्यानंतर सदर मतदान केंद्रातील मतदान चालू करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सदर मतदान केंद्राचे मतदान चालू होते याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करीत असून गुन्हा दाखल करण्याचे कामकाज करमाळा पोलीस स्टेशन येथे चालू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button