महाराष्ट्र
सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला करमाळा तालुका बार असोसिएशन चा पाठिंबा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणां देत आज करमाळा तालुका बार असोसिएशन ने सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला.

करमाळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गेली पाच दिवसापासून चालू असलेल्या साखळी उपोषणाला करमाळा तालुक्यातील तब्बल 40 गावांनी सदरच्या उपोषणाला पाठिंबा देत तसेच निवेदनाच्या प्रती तहसीलदार कडे देत आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी करमाळा तालुका बार असोसिएशन ने विविध घोषणा देत आपला पाठिंबा दिला यावेळी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



