महाराष्ट्र

पालघर जिल्हा वनविभाग वाडा येथील महिला सहाय्यक वनसंरक्षक वर्षा राणी खरमाटे आणि खाजगी वाहन चालक मुरलीधर बोडके या दोघांविरुद्ध अँटीकरप्शन ब्युरो पालघर यांची कारवाई

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क निर्गत दाखला मंजूर करून देण्यासाठी एका (50 )वर्षीय पुरुष तक्रारदार इसमा कडून 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी महिला सहाय्यक वनसंरक्षक वाडा (पालघर जिल्हा) वर्षाराणी राजाराम खरमाटे (वय वर्ष 40) आणि मुरलीधर शांताराम बोडके (वय वर्ष 58 )राहणार वाडा खाजगी वाहन चालक या दोघांविरुद्ध

अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार संजय सुतार, निशा मांजरेकर, नितीन पागधरे, योगेश धारणे, पोलीस शिपाई सखाराम दोडे, स्वाती तारवी यांच्या पथकाने सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी कारवाई केली असून या दोघांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चौकशी करून मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button