महाराष्ट्र

रमजानच्या महिन्यात पाणी पुरवठा व वीज वितरण सुरळीतपणे सुरू रहावे,करमाळा सकल मुस्लिम समाजाची मागणी

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

शांती एकता सद्भावना व सलोख्याचे शिकवण देणारा रमजानचा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे या पवित्र महिन्यात मुस्लीम धर्मीय रोज पहाटे उठून रोजा(उपवास) ठेवण्यासाठी उठत असतो या साठी पाण्याची आवश्यकता भरपूर असते त्यामुळे करमाळा नगरपालिका यांनी पाण्याची कमतरता पूर्ण रमजानच्या महिन्यात कमी न पडु देता मुबलक पाणी पुरवठा करमाळा शहरातील सर्व भागात सुरळीतपणे करावा कारण करमाळा शहरात एक दिवसा आड येणारे पाणी आता दोन तीन दिवसांनी पाणी येत आहे व त्यात उन्हाळ्याचे दिवस असुन दिवसभर उपवास ठेवून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे

व यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल त्यामुळे मा. राठोड साहेब मुख्याधिकारी करमाळा नगर पालिका व पाणी पुरवठा विभाग नगरपालिका यांनी योग्य असे पाण्याचे नियोजन करून किंवा वेळ प्रसंगी पाणी पुरवठा मध्ये विस्कळीत पणा झाला तर नागरिकांना पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे .

तसेच करमाळा शहर व तालुक्यातील वीजपुरवठा सहेरीच्या वेळेत पहाटे व संध्याकाळी रोजा इफ्तार उपवास सोडताना खंडीत करण्यात येऊ नये व रमजान महिन्यात होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वीज पुरवठा विभाग करमाळा व करमाळा नगरपालिका यांनी योग्य असे नियोजन करावे अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी जमीर भाई सय्यद ( विश्वस्त अध्यक्ष जामा मस्जिद करमाळा), आझाद भाई शेख ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा ), रमजान भाई बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा),सुरज भाई शेख ( सचिव रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट करमाळा) दिशान भाई कबीर ( युवक नेते ), आरबाज भाई बेग( युवक नेते ), आलिम भाई खान ( सामाजिक कार्यकर्ते ) , इम्तियाज भाई पठाण ( सामाजिक कार्यकर्ते),शाहीद बेग (सामाजिक कार्यकर्ते )उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button