राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर युवक जिल्हा उपाध्यक्षपदी महेश शिंदे यांची निवड

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
माळशिरस तालुक्यातील अकलूज गावी स्थानिक असलेले मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष महेश (भाऊ) शिंदे यांनी 16 फेब्रुवारी रोजी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये प्रवेश केला होता

महेश शिंदे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून जनसामान्यापर्यंत त्यांचा चांगला संपर्क आहे.अनेक सामाजिक उपक्रम आंदोलने उपोषणे शिबिरे यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महेश शिंदे मनाली की यापुढे युवकांचे संघटन वाढवण्याचा व त्यांचे प्रश्न सोडवण्यावर मी जास्त भर देणार आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सोबत कायम प्रामाणिक व एकनिष्ठ राहणार आहे.



