मनीषाताई चौधरी यांच्या प्रयत्नांना यश… डहाणू धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल अँड रिचार्ज सेंटरमध्ये पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार विनामूल्य उपचार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील रुग्णांना शासकीय आरोग्य संस्थांमध्ये विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवणे तसेच संदर्भीय सेवेसाठी इतरस्त पाठवणा ऐवजी डहाणू धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये विनामूल्य उपचारासाठी दाखल करण्याच्या दृष्टीने करानामा करण्यात येणार आहे. या करारनाम्याची अंतिम मुदत मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली असून जिल्ह्यातील रुग्णांना जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.

कारण पालघर जिल्ह्यात अजूनही जिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाले नसून चिंताजनक स्थिती असलेल्या रुग्णांना गुजरात येथील सिलवासा दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश तसेच मुंबई ठाणे व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवले जाते या संदर्भात विधानसभा सदस्य मनीषा ताई चौधरी यांनी 2024 च्या विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर या अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत विन्या मूल्य वैद्यकीय सेवा या जिल्ह्यातील रुग्णांना देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर येथील जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत पालघर येथील खाजगी वैद्यकीय रुग्णालय वेदांत व सार्वजनिक आरोग्य विभागाशी करारनामा करून विशेष उपचार वैद्यकीय सेवा लागणाऱ्या रुग्णांना यापुढे वेदांत रुग्णालयाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.



