माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण

बी टी शिवशरण
माळशिरस तालुक्यात सध्या राजकीय चर्चा घडामोडींची चर्चा टीकाटिप्पणी जोरदार सुरु आहे २०२४ ची लोकसभा निवडणूक अद्याप आठ महिने लांब आहे मात्र माळशिरस तालुक्यात माढा लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार याची चर्चा हवा सुरू आहे बाकी राजकीय समीकरण चर्चा वातावरण काही असो माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील ही अशी सामाजिक राजकीय शक्ती आहे की ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण कारण पक्ष कोणताही असो माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील हाच पक्ष म्हणून कार्यकर्ते त्यांचा शब्द प्रमाण मानून कार्यरत असतात मग उमेदवार कोण आहे या पेक्षा मोहिते पाटील यांनी ठरवले आहे
त्यालाच निवडून दिले जाते मोहिते पाटील यांनी राजकारणात कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली आहे त्यांची निष्ठा आदर सैद्धांतिक बैठक ही मोहिते पाटील यांचेशी अभेद्य आहे सोलापूर जिल्ह्यात अकलूज ही जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखली जात होती त्यामुळे आता जे दुसर्याच्या वळचणीला जाऊन तात्पुरती सत्तेची पदे भुषवत आहेत ते अकलूजला शिव रत्न वर येऊन मोहिते पाटील यांचे आखाड्यात राजकारणाचे धडे घेतले आहेत मोहिते पाटील यांचे बोट धरून चालायला शिकले होते ते फुरफुरायला लागल्याचे चित्र आहे जिल्ह्यातील गावपातळी पासुन ते तालुका जिल्ह्यात जे नेते कार्यकर्ते प्रतिष्ठित म्हणून मिरवत आहेत

ते मोहिते पाटील यांचे आखाड्यात तयार झालेले आहेत ही एक बाजू झाली दुसरी बाजू अशी की मोहिते पाटील यांनी केवळ राजकारण पाहिले नाही तर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक सहकार क्षेत्रात भक्कम काम उभे केले आहे त्यामुळे इथ सहकार चळवळ व्यापक झाली प्रत्येकाला हाताला काम शिक्षण व्यवसाय मिळाला त्यामुळे आर्थिक परिवर्तनाचे चक्र फिरत राहिले आता जे राजकारण समाजकारण यांच्या गप्पा मारत निवडणूक आखाड्यात दंड थोपटून उभे रहाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी तालुक्यात कोणते काम केले
किंवा करणारं आहेत याचे त्यांनी तालुक्यातील जनतेला अवगत करावे बाहेरून लादलेल्या उमेदवारांना निवडून देण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आले आहेत पक्षाला डोईजड कोण या पेक्षा पक्षाची ताकद कुणामुळे हे महत्त्वाचे आहे या वेळी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ होईल अशी अपेक्षा आहे काही ही झाले तरी मोहिते पाटील ठरवतील तेच लोकसभा विधानसभा निवडणुकीत होईल हे निश्चित



