विशेष

करमाळ्याचा तरुण युवक ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य राबवतोय केंद्र सरकारचा नशा मुक्त भारत अभियान योजना,,, सदर योजनेला मिळत आहे उस्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

केंद्र सरकारच्या नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांचे ग्राम. सर्जापुर,तालुका. बार्शी. जिला. सोलापूर.येथे सोलापूर जिल्हा समाज कल्याण विभाग तर्फे आयोजित नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे.शहरी तसेच ग्रामीण भागात देखिल तरुण मुले मुली तसेच वृद्ध आणि महिला देखील बराच प्रमाणात तंबाखू, गुटखा सेवनाचा आहारी गेल्याचे दिसून येते.ग्रामीण भागातील महिला विशेषतः तंबाखू, गुटखा चे सेवन करीत असतात..

यात शेत मजूर , गवंडी काम करणारे हमाली करणारे म्हणजेच जांचे हातावर पोट आहे असा समाज घटक व्यसनाधीन झाला आहे..त्यांचे सतत प्रबोधन होणे गरजेचे आहेआपला देश अधिक सशक्त करण्यासाठी देशातील लोक सर्वच बाबतीत सशक्त असणे गरजेचे आहे.या सर्व बाबी वर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे असे मत सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी मांडले.मुला – मुलींना तसेच महिला – पुरुष,तसेच सिनियर सिटिझन यांचात व्यायामाची आवड निर्माण करणे व त्याद्वारे आरोग्याचे महत्त्व समजावून सांगणे

आणि व्यसनाधीन पासून कसे दूर राहता येईल याविषयी मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचे आहे असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले आणि त्याद्वारेच महेश वैद्य हे नशा मुक्त भारत अभियानाचे काम करीत आहेतज्यांना व्यायामाची आवड व महत्त्व समजले अशा व्यक्ती व्यसनाधीनते पासून दूर राहतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.अशा पद्धतीद्वारे प्रसार आणि प्रचार केला तर याचा निश्चित सकारात्मक परिणाम पहावयास मिळत आहे.नशा मुक्त भारत अभियानाचे सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य हे एक उत्कृष्ट व्यायाम पट्टू आहेत.

त्यांनी 1993 मध्ये करमाळा येथे एका दमात 7777 जोर मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच एका तासात तीन हजार डीप्स मारून लातूर येथे 1995 मध्ये विक्रम प्रस्थापित केला. याचा अनुभव नशा मुक्त भारत अभियान मध्ये ते करीत आहेत ज्याचा सकारात्मक परिणाम पहावयास मिळतो आहे.आरोग्याची काळजी असलेली व्यक्ती सहसा व्यसनाधीन होत नाहीत…असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले.या अभियानास करमाळा येथील उद्योजक महेश दोशी, संतोषकाका कुलकर्णी बालासाहेब होसिंग तसेच पत्रकार अविनाश जोशी,अशपाक भाई, आलीम शेख तसेच नरेंद्र ठाकूर तसेच सुनील सूर्यपुजरी,विवेक येवले आदींचे सहकार्य लाभले.तसेच गुरुवर्य श्री विनोदकुमार गांधी भाऊसाहेब फुलारी रामकृष्ण माने सर यांचे सहकार्य लाभत आहे.हितचिंतक तसेच करमाळा तालुक्यात डोळ्याचा संदर्भ असो किंवा कोणतेही सामाजिक काम असो यात आमचे मित्र समाजसेवक किसन कांबळे सर यांचे सर्व प्रकारचे सहकार्य लाभत आहे.हा उपक्रम सोलापूर जिल्हा परिषद द्वारे समाज कल्याण विभाग तर्फे राबविण्यात येत आहे श्री सुनिल खामित्कर साहेब समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दील्ली येथील नशा मुक्त भारत अभियान च्या प्रमुख अनुष्का गुप्ता मॅडम यांचे सतत मार्गदर्शन होत असते.या सर्वांचे महेश वैद्य यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button