महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचा करकंब ग्रामपंचायतीच्या विरोधात आक्रोश व घागर मोर्चा आंदोलनाचा इशारा

प्रतिनीधी… रियाज मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो.99 21 500 780

करकंब ग्रामपंचायत येथील शंकर नगर,वार्ड क्र 6 मध्ये मागील दोन ते तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही, वापरायचे पाणी नाही, लाईट नाही, सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, बंदिस्त गटारी नसल्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे,

ईथे सिमेंटचे रस्ते देखिल नाहीत,यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याने वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे व वंचित चे पदाधिकारी यांनी करकंब ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना
आठ दिवसात मार्ग काढावा व प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन देऊन विनंती केली आहे

तसेच सर्व मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास करकंब ग्रामपंचायत च्या विरोधात हलग्यांच्या गजरात महिलांचा घागर मोर्चा व आक्रोश मोर्चा हा दिनांक 4/3/2024 रोजी दुपारी बारा वाजता काढणार असल्याचे ईशारा देखील दिला आहे.

आणि या आंदोलनादरम्यान जर काही अनुचित प्रकार घडला तर त्यास सर्वस्वी सरपंच , ग्रामसेवक व सदस्य जबाबदार असतील असे निवेदन पत्रात मध्ये उल्लेख देखिल केला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button