विशेष

पालघर जिल्ह्यातील बोईसर कुडण गावात दोन व्यक्तींचा खून करून फरार झालेल्या आरोपींला अवघ्या तीन तासात जेरबंद करण्यात तारापूर पोलिसांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील कुडण गावात एका वेडसर अज्ञात इसमाने 2 ज्येष्ठ नागरिकांवर हिंसक हल्ला करून त्यांचा खून केला होता. ही घटना गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 07 वाजण्याच्या सुमारास घडली होती. बोईसर कुडण गावातील भीमराव पाटील व मुकुंद पाटील यांच्या डोक्यावर कुदलीच्या साह्याने जबरी मारहाण केल्यामुळे या दोन व्यक्तींचा खून झाला होता. हा खून करून हा वेडसर व्यक्ती या गावातील झुडपात पळून गेला होता. या व्यक्तीचा पालघर व तारापूर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन तासात कसून शोध घेऊन त्याला कुडण गावातील एका खाडी-तलावाच्या पाण्यातील चिखलात लपून बसला असताना जेरबंद करण्यात गुरुवारी रात्री 11:30 वाजता तारापूर पोलिसांना यश आले आहे. सध्या हा आरोपी तारापूर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button