जेऊर येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर टोपे यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा परिषदे समोर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रत्नदीप टोपे यांच्या मनमानी विरोधात दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत
जेऊर येथील वैद्यकीय प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर रत्नदीप टोपे हे मनमानी तसेच हुकुमशाही पद्धतीने कामकाज करीत असून कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम डॉक्टर टोपे हे करीत आहेत

डॉ रत्नदीप टोपे
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर तालुका करमाळा यांनी मनमानीपणे व अन्याय कारकआणि नियमबाह्य सेवा पुस्तकात नोंदी घेणे सेवा संपुष्टात आणण्याची धमकी देणे. मनमानीपणे वेतन कपात करणे , तहकूब ठेवणे.आर्थिक नुकसान करणे मासिक सभेमध्ये अपशब्द बोलणे वरिष्ठांना वसंबंधितांना न कळवणे फरकाची रक्कम अदा न करणेअशा अनेक अन्यायकारक कारवाई केल्याने जेऊर येथील वैद्यकीय कर्मचारी श्रीमती आर वाय सय्यद तसेच पी व्ही सरडे हे दोन आरोग्य कर्मचारी डॉक्टर रत्नदीप टोपे यांच्या मनमानी व हुकूमशाहीला कंटाळून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर काल पासून आमरण उपोषणाला बसले आहेत तेव्हा आम्हास या वरिष्ठांच्या त्रासापासून मुक्त करावे व आम्हास न्याय मिळावा असे आरोग्य कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले. सदरच्या आमरण उपोषणाला सोलापूर येथील नर्सेस संघटनेने पाठिंबा दिला आहे



